यो यो हनी सिंहच्या नव्या गाण्याचा धुमाकूळ, पाहा VIDEO 

कला संगीत
Updated Dec 28, 2020 | 19:21 IST

ख्रिसमसच्या निमित्ताने रिलीज झालेलं यो यो हनी सिंगचं नवं गाणं जिंगल बेल इंटरनेटवर व्हायरल झालं आहे. या गाण्याला काही दिवसात १ कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

मुंबई: २८ वर्षाच्या हनी सिंगने स्वतःच्या गाण्यांनी पंजाबी संगीत इंडस्ट्रीपासून बॉलिवूडमध्ये आपलं नाव कमावलं आहे. हनी सिंह हा असा गायक आहे की,  ज्यांची लोकप्रियता केवळ भारतपुरती मर्यादित नाही तर परदेशातही आहे. हनी सिंगची गाणी इंटरनेटवर रिलीज होताच रातोरात व्हायरल होतात. सोशल मीडियावर त्याच्या फॉलोअर्सची संख्या कोट्यावधी आहे. यावरून आपणास तरुणांमधील त्याची क्रेझ किती आहे याची आपल्याला कल्पना येईल. नुकताच ख्रिसमसच्या निमित्ताने हनी सिंगचे नवे गाणे 'जिंगल बेल' रिलीज झाले आहे.

हे गाणे रिलीज होताच ते इंटरनेटवर इतके व्हायरल होत आहे की काही दिवसात गाण्याला १ कोटीहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. ज्यावरुन आपल्याला गाण्याची लोकप्रियता लक्षात येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी