[VIDEO] बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडच्या रोमांटिक क्षणांची कहाणी 

कला संगीत
Updated Oct 20, 2019 | 03:05 IST

Punjabi Song Latest 2019: नुकतंच नवं पंजाबी गाणं वे सोणया हे रिलीज झालं आहे. या म्युझिक व्हिडिओमध्ये गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड यांची एक कहाणी सांगण्यात आली आहे. 

मुंबई: Punjabi Song Latest 2019 Ve Soniya:पंजाबी गाणं म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर सगळ्यात आधी येतात ते म्हणजे ढोल-नगारे आणि भांगडाचं म्युझिक. पण पंजाबी सिनेमात रोमांटिक गाण्याचा देखील एक वेगळाच चार्म असतो. नुकतंच नवं पंजाबी गाणं वे सोणया रिलीज झालं आहे. या म्युझिक व्हिडिओमध्ये गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडची संपूर्ण लव्ह स्टोरी ही अवघ्या ३ मिनिटं आणि १५ सेकंदात सांगण्यात आली आहे. पण या गाण्याचा शेवट हा प्रेक्षकांना धक्का देणारा आहे. 

या नव्या पंजाबी गाण्यात राहुल राजपूत आणि मनिषा निलावती दिसत आहेत. हे गाणं अंकुर आणि पाठक यांनी गायलं आहे. काही तासात या गाण्याला यूट्यूबवर हजारो हिट्स मिळाले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी