Aryan Khan Drugs case: शाहरुख खान आणि समीर वानखेडे यांच्यात झालेले संभाषण खोटे असल्याचा दावा

Shahrukh Khan and Sameer Wankhede leaked chats were fake: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नवीन अपडेट समोर आले आहे. किंग खानच्या लीक झालेल्या सर्व चॅट्स बनावट असल्याचा दावा शाहरुख खानच्या मित्राने केला आहे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी वाचा संपूर्ण बातमी...

Updated May 21, 2023 | 07:05 PM IST

Shahrukh Khan and Sameer Wankhede's Viral Chat Has Fack

समीर वणखेडे आणि शाहरुख खान दारम्यानचे संभाषण खोटे असल्याचा दावा

फोटो साभार : Times Now
थोडं पण कामाचं
  • लीक चॅट बनावट असल्याचा मित्रांनी केला दावा
  • शाहरुख खान WhatsApp वापरत नसल्याची दिली माहिती
Shahrukh Khan and Sameer Wankhede leaked chats were fake:आर्यन खान ड्रग्ज प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. जिथे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयने शाहरुख खानकडून लाच मागितल्याचा आरोप केला आहे. सीबीआयने समीरविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली असून, समीरने आर्यन खानला जाणीवपूर्वक लाचेसाठी फसवले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ज्यामध्ये समीर वानखेडे यांनी सांगितले की शाहरुख खान त्यांना वारंवार मेसेज करत होता. त्याचवेळी आदल्या दिवशी शाहरुख खानने पाठवलेले मेसेजही लीक झाले होते. ज्यामध्ये शाहरुख खान समीरला मुलगा आर्यन खानसोबत चांगले वागण्याचे आवाहन करताना दिसत आहे.
यादरम्यान, शाहरुख खानच्या एका मित्राने शाहरुख खानच्या लीक झालेल्या चॅट्स बनावट असल्याचा दावा केला आहे. किंग खानच्या मित्राने या चॅटला खोटे म्हटले असून त्यात काही तथ्य नसल्याचे सांगितले आहे. ETimes शी बोलताना, नाव उघड न करण्याच्या अटीवर शाहरुखच्या मित्रांनी या चॅट्स फेटाळून लावल्या असून, शाहरुख व्हॉट्सअॅप वापरतच नाही असे म्हंटले आहे.
त्यांनी पुढे असे स्पष्ट केले आहे की, " शाहरुख Whatsapp मुळात वापरतच नाही. त्यामुळे संभाषण होऊच शकत नाही. जर हे संभाषण तथ्य असेल, तर त्याने वानखेडे यांच्यासाठी चॅट बॉक्स तयार केला असता. शाहरुख इतका मूर्ख नक्कीच नाही आहे की तो स्वत:ला सार्वजनिक डोमेनमध्ये ठेवेल, या संभाषणात वापरलेली भाषा, यात घेतलेळे पूर्णविराम, आणि ज्या पद्धतीने आपल्या मुलासाठी एक वडील सरकारी अधिकाऱ्याला विनवणी करताना दिसतो आहे, ते पाहता हे संभाषण नक्कीच खरे असण्याची शक्यता नाही. मुळात शाहरुख असे बोलतच नाही" असे शाहरुखच्या मित्रांनी सांगितले.
जेव्हा आर्यनला तुरुंगात टाकण्यात आले, त्यावेळी त्याला बाहेर काढण्यासाठी शाहरुख खान कोणाकडेही गेला नाही. त्याचा कायद्यावर ठाम विश्वास होता आणि त्याला त्यांचे काम करून द्यायचे होते. अनेक रात्रीची झोप घालवून शाहरुख आपल्या मुलाच्या सुटकेची वाट पाहत होता. त्याने सरकारी कामात हस्तक्षेप केला नाही, वा सरकारी अधिकारीला कोणतीही विनंती केली नाही. त्याला माहित होते की आर्यन निर्दोष आहे. त्यामुळे त्याने फक्त वाट पाहिली." असे त्यांनी पुढे सांगितले.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited