Ashish Vidyarthi : वयाच्या 60 व्या वर्षी लग्न करणाऱ्या आशिष विद्यार्थीची दुसरी पत्नी कोण आहे?

Ashish Vidyarthi second wedding: बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या 60 व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे. 25 मे रोजी आशिष विद्यार्थीने आसाममधील रहिवासी रुपाली बरुआसोबत सात फेरे घेतले. आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ यांच्या लग्नाला काही निवडक लोकच उपस्थित होते कारण दोघांनीही त्यांच्या लग्नात अगदी जवळच्या लोकांना आमंत्रित केले होते.

Updated May 26, 2023 | 07:03 AM IST

Ashish Vidyarthi second wedding.

Ashish Vidyarthi second wedding

फोटो साभार : BCCL
Ashish Vidyarthi second wedding: बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या 60 व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे. 25 मे रोजी आशिष विद्यार्थीने आसाममधील रहिवासी रुपाली बरुआसोबत सात फेरे घेतले. आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ यांच्या लग्नाला काही निवडक लोकच उपस्थित होते कारण दोघांनीही त्यांच्या लग्नात अगदी जवळच्या लोकांना आमंत्रित केले होते. आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ यांच्या लग्नाचा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आणि चरर्चा सुरू झाली. (Ashish Vidyarthi Wedding Who is Ashish Vidyarthi's second wife)
कलाकार आशिष विद्यार्थी यांनी या खासगी समारंभात एकमेकांना पती-पत्नी म्हणून स्वीकारले. या लग्नाला फार कमी लोकांनी हजेरी लावली होती, त्यामुळे चाहत्यांना लग्नाचे बरेच फोटो बघायला मिळत नाहीत. मात्र, त्यांच्या लग्नाचा समोर आलेला एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघेही लग्नमंडपात दिसत आहेत. आशिष विद्यार्थी पांढऱ्या कुर्त्यात तर रुपाली बरुआ पांढऱ्या साडीत दिसत आहे. आशिष आणि रुपाली एकमेकांसोबत खूप आनंदी दिसत आहेत. या दोघांच्या फोटोवर चाहते कमेंट करत आहेत आणि त्यांना लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत.

कोण आहे आशिष विद्यार्थीची दुसरी पत्नी रुपाली बरुआ

आशिष विद्यार्थीची दुसरी पत्नी रुपाली बरुआ कोण आहे असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की ती कोलकात्याची आहे आणि फॅशन इंडस्ट्रीशी संबंधित आहे. रुपाली बरुआ ही कोलकातामध्ये एक उद्योजिका असून तिचे कोलकातामध्ये प्रसिद्ध नाव आहे. रुपालीशी लग्न केल्यानंतर आशिषने मीडियाला सांगितले की, हा त्याच्यासाठी एक खास क्षण आहे, ज्याचे तो शब्दात वर्णन करू शकत नाही.

बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited