शिल्पा शेट्टीच्या पतीला न्यायालयाचा झटका; राज कुंद्राच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

बी टाऊन
भरत जाधव
Updated Jul 27, 2021 | 16:05 IST

बॉलिवूड अभिनेत्री (bollywood actress) शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि उद्योगपती राज कुंद्राला (Raj Kundra) अश्लील चित्रपट (porn movie) प्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

14 days extension in Raj Kundra's judicial custody
राज कुंद्राच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने २० जुलैला अटक केली.
  • २३ तारखेच्या सुनावणीत २७ जुलैपर्यंत पोलीस पोलिस कोठडी वाढवण्यात आली होती.
  • राज कुंद्राची कानपूरमधील दोन बँक खाती सील करण्यात आली आहेत.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री (bollywood actress) शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि उद्योगपती राज कुंद्राला (Raj Kundra) अश्लील चित्रपट (porn movie) प्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राज कुंद्रासोबत त्याचा सहकारी रायन थॉर्पच्याही न्यायालयीन कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. तर राज कुंद्राचे वकील सुभाष जाधन यांनी राज कुंद्राच्या जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या सुनावणी पार पडणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने २० जुलैला अटक केली आहे. पोर्नोग्राफीच्या आरोपांखली अटक करण्यात आलेल्या राज कुंद्राविरेधात पोलिसांच्या हाती अनेक पुरावे लागले आहेत. राज कुंद्राच्या अटकेपासूनच रोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पॉर्न फिल्म प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने याच वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये मढ येथील एका बंगल्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली होती. त्यानंतर राज कुंद्र यांनी तातडीने आपल्याकडी सर्व डेटा डिलीट केला होता आणि तसेच त्यांनी आपला मोबाइल फोनही बदलला होता, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रॅचने राज कुंद्राला काही अॅपच्या माध्यमातून पॉर्नोग्राफिक फिल्म बनवण्यासाठी आणि त्या प्रदर्शित करण्यासाठी अटक केली आहे. दरम्यान फेब्रुवारी २०२१ मध्ये मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रॅचकडे एक तक्रार नोंदवण्यात आली होती. ही तक्रार पॉर्नोग्राफिक फिल्म्सची निर्मिती करण्याचा आणि त्या काही अॅपच्या माध्यमातून प्रदर्शित करत असल्यासंदर्भातील ही तक्रार होती. पोलीस त्याप्रकरणी तपास करत होते, त्या तपासाअंती २० जुलैला राज कुंद्राला अटक करण्यात आली. राज कुंद्राला अटक  झाल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

अटक झाल्यानंतर राज कुद्राला २३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर पोलिस चौकशीत राज कुंद्रा विरोधात अनेक पुरावे हाती लागले. दरम्यान २३ तारखेच्या सुनावणीत २७ जुलैपर्यंत पोलीस पोलिस कोठडी वाढवण्यात आली होती.दरम्यान राज कुंद्र आणि शिल्पा शेट्टीच्या बँका खात्यांची देखील मुंबई गुन्हे शाखेने चौकशी केली असता खळबळजनक माहिती समोर आली आहे. राज कुंद्राच्या बँक खात्यांमधून कोट्यावधी रुपयांचे व्यवहार होत असल्याचे उघड झाले आहे. तर राज कुंद्राची कानपूरमधील दोन बँक खाती सील करण्यात आली आहेत.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी