Salman Khan House: कोटीच्या घरात आहे १५० एकरातील फार्महाऊस किंमत; तरीही सलमान का राहतो middle class व्यक्तीसारखं 1 BHK फ्लॅटमध्ये

बी टाऊन
भरत जाधव
Updated Sep 21, 2022 | 11:48 IST

सलमान खानची (Salman Khan) केवळ भारतातच नाही, तर जगभरात मोठी फॅन फॉलोईंग आहे. त्याचं कोट्यवधींचं नेटवर्थ आहे. पनवेलमध्ये सलमानचं मोठं शाही फार्महाऊस (Farmhouse) आहे, तरीही सलमान खान एक छोट्या फ्लॅटमध्ये राहतो.

Why does Salman with a net worth of crores still live in a 1 BHK flat?
कोट्यवधींचं नेटवर्थ तरीही सलमान का राहतो 1 BHK फ्लॅटमध्ये  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सलमानने २०२० मध्ये लॉकडाउनमधला वेळ पनवेलच्या फार्महाऊसमध्ये घालवला होता.
  • फार्महाऊस जवळपास १५० एकरवर पसरलेलं आहे.
  • सलमानचा गॅलेक्सी अपार्टमेंट फक्त एक बेडरूमचा फ्लॅट आहे

मुंबई  : सलमान खानची (Salman Khan) केवळ भारतातच नाही, तर जगभरात मोठी फॅन फॉलोईंग आहे. त्याचं कोट्यवधींचं नेटवर्थ आहे. पनवेलमध्ये सलमानचं मोठं शाही फार्महाऊस (Farmhouse) आहे, तरीही सलमान खान एक छोट्या फ्लॅटमध्ये राहतो. हे ऐकून अनेकांना झटका लागला असेल. पण हे खरं आहे. सलमानच्या पनवेलमधील (Panvel) फॉर्महाऊसची किंमत कोटीवधीच्या रुपयांमध्ये आहे. (150 Acres Farmhouse Price is in cr; then why does Salman live in a 1 BHK flat)


१५० एकरमध्ये पसरलंय सलमानचं फार्महाऊस

सलमानने २०२० मध्ये लॉकडाउनमधला वेळ पनवेलच्या फार्महाऊसमध्ये घालवला होता. मुंबईतील वांद्र्यात सलमानचे अपार्टमेंट असून तिथे तो त्याच्या आई-वडिलांसोबत राहतो. सलमानच्या फार्महाऊसचे नाव अर्पिता फार्म्स आहे. सलमानची बहिण अर्पिता खानच्या नावाने या फार्महाऊसचं नाव ठेवण्यात आले आहे. हे फार्महाऊस जवळपास १५० एकरवर पसरलेलं आहे. यात प्रायव्हेट पूलसह इतर सर्व लग्झरी सुविधाही आहेत.

Read Also : कॉमेडिअन राजू श्रीवास्तव याचे निधन

इतकी आहे फार्म हाऊसची किंमत

रिपोर्ट्सनुसार, या फार्महाऊसची व्हॅल्यू ८० कोटी रुपये आहे. फार्महाऊसमध्ये आधुनिक जिम, घोडे, स्विमिंग पूलही आहे. सलमान 'बीइंग स्ट्राँग फिटनेस इक्विप्मेंट' आणि 'SK27 Gym'फ्रेंचाइजचा मालक आहे. त्यामुळे त्याच्या फार्महाऊसमधील जिममध्ये या इक्विप्मेंट्सचा वापर केला गेला आहे. या फार्महाऊसमध्ये अनेक अलिशान खोल्या असून इथे एक लक्झरी बंगलाही आहे. सलमानने या फार्महाऊसमध्ये घोड्यांसाठी तबेलाही बांधला आहे. या फॉर्महाऊसच्या आवारात तो अनेकदा घोडेस्वारी करताना दिसत असतो.

१ बीएचके अपार्टमेंटमध्ये राहतो सलमान

पनवेल फार्म हाऊसमध्ये अनेक सुंदर कोपरे आहेत. पण जलतरण तलावाजवळील बुद्धाची मोठी मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. गर्दीपासून दूर जाण्यासाठी सलमान खान पनवेलच्या फार्म हाऊसवर जात असतो. हे जितंक खरं आहे तितकचं हे खरं आहे की सलमान खान एका वन बीएचके फ्लॅटमध्ये राहतोय. गेल्या अनेक वर्षांपासून तो वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये आई सलमा आणि वडील सलीम खान यांच्यासोबत राहतो. त्याची सावत्र आई हेलनही त्याच्यासोबत राहते. कुटुंब हेच त्याच्यासाठी सर्वस्व आहे, असे सलमान अनेकदा म्हणत असतो. एवढा मोठा स्टार आणि भरपूर पैसा असूनही तो अनेक वर्षांपासून आपल्या आई-वडिलांसोबत एका छोट्या घरात राहत आहे.

Read Also : या गोष्टी आहेत उत्तम नेत्याचे लक्षण, विरोधकही होतात प्रशंसक

सोफ्यावर झोपतो सलमान, नाही चालवत एसी 

सलमान हा देशाचा मोठा स्टार आहे आणि जगभरात त्याचे लाखो चाहते आहेत. त्याची वार्षिक कमाई आणि नेटवर्थही काही हजार कोटी आहे, पण सलमान मोठ्या मनाचा आहे. सलमान मध्यमवर्गीय माणसाप्रमाणे राहणीमान ठेवत असतो. ज्याचा उल्लेख त्यांचे मित्र महेश मांजरेकर यांनी एका मुलाखतीतही केला होता. महेश मांजरेकर म्हणाले होते की, ते जेव्हाही गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये जातात तेव्हा त्यांना सलमान नेहमी सोफ्यावर झोपलेला दिसतो. 

सामान्य माणसासारखे जीवन, अपार्टमेंट आहे लहान 

सलमानचे गॅलेक्सी अपार्टमेंट वांद्रे, मुंबई येथे आहे, जो एक पॉश भाग आहे. पण सलमानचे हे अपार्टमेंट पाहून कुणालाही आश्चर्य वाटेल. कारण सलमानचे हे घर इतर सिनेतारकांच्या आलिशान घरांसारखे नाही.  सलमानचा गॅलेक्सी अपार्टमेंट फक्त एक बेडरूमचा फ्लॅट आहे, ज्यामध्ये त्याने त्याचे संपूर्ण बालपण घालवले. सलमान म्हणतो या घरात आई-वडिलांसोबत छान आठवणी उभ्या राहिल्या आहेत. सलमानलाही आलिशान घरात राहायचे नाही. काही वर्षांपूर्वी तो एका मुलाखतीत म्हणाला होता, 'माझ्या या घरात खूप आठवणी आहेत. इथल्या इमारतीतल्या बाकीच्या मुलांसोबत खेळायचो, मजा करायचो. कधी तो मित्रांसोबत त्याच्या घरी जेवायचा तर कधी त्यांच्या घरी जेवायचा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी