सुशांत सिंह राजपूत नंतर आता १६ वर्षीय सोशल मीडिया स्टारची आत्महत्या

Suicide: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केल्यानंतर आता एका १६ वर्षीय सोशल मीडिया स्टारने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. 

Siya Kakkad
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • १६ वर्षीय सोशल मीडिया स्टारची आत्महत्या 
  • आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट 
  • १९ तासांपूर्वीच आपला एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियात केला होता पोस्ट 

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने १४ जून रोजी मुंबईत (Mumbai) आपल्या राहत्या घरात आत्महत्या (Suicide) केली. या घटनेने सर्वांनाच एक मोठा धक्का बसला होता. या धक्क्यातून बॉलिवूड बाहेर येत असतानाच आता आणखी एक मोठा धक्का सर्वांना बसला आहे आणि तो म्हणजे एका १६ वर्षीय सोशल मीडिया स्टारच्या आत्महत्येने. १६ वर्षीय सोशल मीडिया स्टारने आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. मात्र, आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट नाहीये.

रात्री झालं होतं मॅनेजरसोबत बोलणं

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रात्री एका गाण्याच्या संदर्भात तिचं बोलणं आपल्या मॅनेजरसोब झालं होतं. मॅनेजरसोबत तिचं रात्री बोलणं झालं होतं. मॅनेजरने सांगितलं की, सर्वकाही ठिक होतं आणि ती अजिबात टेन्शनमध्ये वाटत नव्हती. मात्र, तिने हे पाऊल का उचललं याबाबत काहीच कळत नाहीये.

१९ तासांपूर्वी शेअर केला होता व्हिडिओ 

तिने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केला होता. (हे वृत्त लिहिपर्यंत १९ तासांपूर्वी) तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये डान्स करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओत ती एका पंजाबी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिने हा व्हिडिओ १९ तासांपूर्वी इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला होता आणि हा व्हिडिओ पाच दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता.

चाहत्यांना मोठा धक्का

सोशल मीडिया स्टारने आत्महत्या केल्याच्या वृत्ताने तिच्या चाहत्यांना एक मोठा धक्का बसला आहे. तसेच तिने आत्महत्या करण्याचं पाऊल का उचललं असा प्रश्नही चाहत्यांना पडला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी