Bollywood 2020 clash Year: बॉलिवूडसाठी क्लॅश ईयर ठरणार २०२०, 'या' तारखांना मोठ्या सिनेमांची टक्कर

बी टाऊन
Updated Dec 31, 2019 | 16:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

क्लॅशची सुरूवात २०२०च्या पहिल्याच महिन्यापासून होत आहे. ३ जानेवारीला तीन सिनेमे एकत्रित प्रदर्शित होत आहेत. शिमला मिर्च, सब कुशल मंगल आणि भंगडा पा ले हे तीन सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.

2020 year will be the clash year for Bollywood movies
Bollywood 2020 clash Year: बॉलिवूडसाठी क्लॅश ईयर ठरणार २०२०, या तारखांना मोठ्या सिनेमांची टक्कर  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • येत्या नवीन वर्षात २०२०मध्ये अनेक सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखा सारख्याच आहेत
  • ३ जानेवारीला तीन सिनेमे एकत्रित प्रदर्शित होत आहेत
  • सर्वात मोठा क्लॅश वर्षाच्या सुरूवातीला होणार आहे तो दीपिका पादुकोणच्या छपाकचा अजय देवगण आणि काजोलच्या तानाजीशी

बॉलिवूडमध्ये सध्या सिनेमा बनवण्यापेक्षा त्या सिनेमासाठीची रिलीज डेट ठरवणं कदाचित जास्त कठीण झालं आहे. हेच कारण आहे की येत्या नवीन वर्षात २०२०मध्ये अनेक सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखा सारख्याच आहेत. तसं पाहिलं तर २०२०मध्ये रिलीज डेट्सचा क्लॅश थोडा जास्तच होत आहे. आणि याची सुरूवात २०२०च्या पहिल्याच महिन्यापासून होत आहे. ३ जानेवारीला तीन सिनेमे एकत्रित प्रदर्शित होत आहेत. शिमला मिर्च, सब कुशल मंगल आणि भँगडा पा ले हे तीन सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.

सर्वात मोठा क्लॅश वर्षाच्या सुरूवातीला होणार आहे तो दीपिका पादुकोणच्या छपाकचा अजय देवगण आणि काजोलच्या तानाजीशी. हे दोन्ही मोठे सिनेमे १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहेत. तसेच २४ जानेवारीला आणखी दोन मोठे सिनेमे एकमेकांशी सामना करणार आहेत. कंगना रानौतचा पंगा आणि धवन-श्रद्ध कपूरचा स्ट्रीट डान्सर ३डी हे दोन्ही सिनेमे याच दिवशी प्रदर्शित होणार आहेत.

त्यानंतर वर्षातील सर्वात मोठा क्लॅश ईदच्या मुहूर्तावर होणार आहे. सलमान खानचा राधे – द मोस्ट वॉन्टेड कॉ आणि अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब दोन्ही एकत्र प्रदर्शित होणार आहेत. तगडे स्टार असणारे हे दोन्ही सिनेमे कसे जादू करतात हे पाहणे तेव्हा उत्सुकतेचे ठरेल. तसं तर सलमान आणि अक्षय या दोघांचेही सिनेमे २०१९मध्येही एकमेकांना टक्कर देत आहेत. सलमानचा दबंग ३ आणि अक्षयचा गुड न्यूज हे सिनेमे सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. एका आठवड्याच्या फरकाने हे दोन्ही सिनेमे रिलीज झाले होते. गुड न्यूज रिलीज झाल्यावर सिनेमाने चांगली कमाई केली, अशातच सलमान खानदेखील २०१९चा हिशोब बरोबरीत करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे.  

Bollywood Movies Clash of Year 2020

प्रदर्शनाची तारीख

सिनेमा

१० जानेवारी

तानाजी, छपाक

२४ जानेवारी

स्ट्रीट डान्सर ३डी, पंगा

ईद

राधे, लक्ष्मी बॉम्ब

३१ जुलै

भूलभुलैय्या, शमशेरा

१४ ऑगस्ट

अटॅक, भुज – द प्राइड ऑफ इंडिया

२ ऑक्टोबर

रॅम्बो, तुफान, सरदार उधम सिंह, सत्यमेव जयते २

२५ डिसेंबर

लाल सिंह चढ्ढा, बच्चन पांडे

 

२०२०च्या सेकंड हाफमधील क्लॅश

ईदनंतर ३१ जुलै हा सर्वात महत्त्वाचा दिवस असणार आहे. कारण त्यादिवशी कार्तिक आर्यनचा भूलभुलैय्या २ आणि रणबीर कपूर, वाणी कपूर, संजय दत्त यांचा शमशेरा हे दोन सिनेमे आमनेसामने असणार आहेत. १४ ऑगस्टला दोन देशभक्तीपर सिनेमे रिलीज होणार आहेत. जॉन अब्राहमचा अटॅक आणि अजय देवगणचा भुज – द प्राइड ऑफ इंडिया हे सिनेमे समोरासमोर असतील.

२०२० वर्षातील सर्वात मोठी रिलीज डेट ठरणार आहे ती २ ऑक्टोबर. या तारखेला ४ मोठे सिनेमे रिलीज होणार आहेत. टायगर श्रॉफचा रॅम्बो, फरहान अख्तरचा तुफान, विकी कौशलचा सरदार उधम सिंह आणि जॉन अब्राहमचा सत्यमोव जयते २ हे आहेत ते चार सिनेमे.

२५ डिसेंबरला लाल सिंह चढ्ढा आणि बच्चन पांडे हे दोन सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. लाल सिंह चढ्ढा या सिनेमात आमिर खान चक्क दोन वर्षांनी मोठ्या पडद्यावर येत आहे. तसेच अक्षय कुमारच्या सध्या रिलीज झालेल्या गुड न्यूज नंतर पुन्हा एकदा ख्रिसमसच्या मुहुर्तावर बच्चन पांडेच्या अवतारात अक्षय दिसणार आहे.

आता पाहायचं हे की, हे सिनेमे आपल्या ठरलेल्या तारखांनाच प्रदर्शित होणार की सिनेमे इकडे तिकडे झाल्याने त्यांच्या प्रदर्शनाचे मुहूर्त पण चुकणार की नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकाच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमांमध्ये बाजी कोणता सिनेमा मारणार हेही पाहण्यासारखे असेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी