Triple Bollywood Clash: बॉक्स ऑफिसवर होणार ट्रिपल क्लॅश, हे ३ मोठे बॉलीवूड सिनेमे एकत्र होणार रिलीज

बी टाऊन
Updated Feb 28, 2020 | 19:06 IST | चित्राली चोगले

2021मध्ये बॉलिवूडमध्ये एक ट्रिपल क्लॅश बॉक्स ऑफिसवर होणारे. दीपिका पदुकोण-अनन्या पांडे-सिद्धांत चतुर्वेदी यांचा सिनेमा, तसंच अक्षय कुमार-धनुष-सारा अली खानचा अतरंगी रे, तर अजय देवगणचा सिनेमा एकत्र रिलीज होणारेत.

3 big bollywood movies to have a triple clash at the box office
Triple Bollywood Clash: बॉक्स ऑफिस वर होणार ट्रिपल क्लॅश, हे ३ मोठे बॉलीवूड सिनेमे एकत्र होणार रिलीज  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • बॉलीवूडमध्ये बॉक्स ऑफिसवर होणार ३ सिनेमांची टक्कर
  • दीपिका पदुकोण, अजय देवगण आणि अक्षय कुमार यांची मुख्य भूमिका असलेले ३ वेगवेगळे सिनेमे होणार एकत्र रिलीज
  • 2021च्या फेब्रुवारी मध्ये होणार हा ट्रिपल क्लॅश

मुंबई : 2020 या वर्षाला नुकतीच सुरुवात झाली असली, तरी बॉलिवूडची तयारी मात्र पुढच्या वर्षीसाठी सुद्धा दणक्यात सुरू झाली आहे. 2020 मध्ये बॉलिवूडमध्ये बरेच मोठे सिनेमे भेटीला येणार आहेत. तसंच 2021साठी सुद्धा मोठ्या सिनेमांची रांग लागायला सुरुवात झाली आहे. यातच पुढच्या वर्षी म्हणजे 2021च्या फेब्रुवारी महिन्यात बॉक्स ऑफिसवर एक मोठा क्लॅश पाहायला मिळणार आहे, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत.  बॉक्स ऑफिसवर होणारी ही टक्कर दोन सिनेमांमध्ये नसून तीन सिनेमांमध्ये असणार आहे. त्यामुळे 2021साठीची बॉलीवूडची सुरुवात धमाकेदार होणार असंच म्हणावं लागेल.

2021 मध्ये फेब्रुवारीमध्ये एकत्र रिलीज होणारे हे तीन बॉलीवूडचे मोठे सिनेमे म्हणजे अजय देवगणचा तामिळ सिनेमा कैथीचा बॉलीवूड रिमेक, दुसरा आहे अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष यांची मुख्य भूमिका असलेला अतरंगी रे आणि तिसरा असेल दीपिका पदुकोण, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी यांचा सिनेमा. नुकतंच अजय देवगणने हे जाहीर केलं की तो तामिळ सिनेमा कैथी सिनेमाच्या रिमेकमध्ये दिसणार असून 12 फेब्रुवारी 2021 ला त्याचा हा सिनेमा रिलीज होईल. कैथी हा एक ऍक्शन थ्रिलर असून प्रचंड गाजलेला सिनेमा आहे. अजयच्या या सिनेमाचं दिग्दर्शन लोकेश नागराज करताना दिसतील.

 

 

याआधी अक्षय कुमारने सुद्धा जाहीर केलं होतं की त्याचा अतरंगी रे हा सिनेमा व्हॅलेंटाईन डे चा मुहूर्त साधत पुढच्या वर्षी रिलीज होईल. आनंद एल राय दिग्दर्शित या सिनेमाला ए आर रहमान संगीत देणार आहेत. तर अक्षय, सारा आणि धनुषचा सिनेमा भूषण कुमार निर्मित करत आहेत. केप ऑफ गुड फिल्स बॅनरखाली सिनेमा रिलीज होईल जो हिमांशू शर्मा यांनी लिहिला आहे. मध्यंतरी अक्षय, सारा आणि धनुषचा एक गोड फोटो या सिनेमा संदर्भात रिलीज केला गेला होता त्याला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसला.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

 

करण जोहरने सुद्धा पुढच्या वर्षाचा व्हॅलेंटाईन डेचं निमित्त साधत १२ फेब्रुवारी २०२१ ही तारिख त्याच्या एका सिनेमासाठी निवडली आहे. हा सिनेमा म्हणजे दीपिका पदुकोण सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्या मुख्य भूमिका असलेला सिनेमा. हा सिनेमा तरुण वयातील रिलेशन्सवर आधारित असून शकून बत्रा याचं दिग्दर्शन करणार आहे. मध्यंतरी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत या सिनेमाबद्दल बोलताना दीपिकाने तिच्या दोन्ही तरुण कोस्टर्स असलेल्या अनन्य आणि सिद्धांतचे कौतुक केलं होतं. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn) on

 

तर असे हे बॉलीवूड मधले तीन मोठे सिनेमे 2021च्या फेब्रुवारीमध्ये भेटीला येणार आहेत. जिथे अजय आणि दीपिकाचा सिनेमे 12 फेब्रुवारी 2021ला भेटीला येतील तिथेच अक्षयचा सिनेमा मात्र 14 फेब्रुवारी 2021ला रिलीज होईल. त्यामुळे दीपिका आणि अजयच्या सिनेमांना दोन दिवस आधी रिलीज होण्याचा फायदा निश्चितच होणार आहे. हे सगळं बोललं असलं तरी या तिन्ही सिनेमांना रिलीज व्हायला अजून बराच वेळ असल्यामुळे रिलीच्या तारखा बदलू शकतात आणि हा ट्रिपल क्लॅश टळू शकतो. येणारा काळंच सांगेल की हा बॉलिवूडचा मोठा ट्रिपल क्लॅश होणार की नाही ते.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी