3 Idiots Sequel : बॉलीवूडमधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक असलेल्या 3 इडियट्सच्या सिक्वेलच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. आमिर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी स्टारर 3 इडियट्सचा भाग 2 येणार असल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरत आहे.
बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खानने देखील इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने निर्मात्यांबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे. करीना म्हणते की, हे लोक तिला सहभागी न करता पार्ट 2 ची तयारी करत आहेत आणि अभिनेत्रीला ही वस्तुस्थिती माहिती नाही.
करीना कपूरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. चाहत्यांना विश्वास आहे की ही निश्चितपणे एक प्रमोशनल अॅक्टीविटी आहे. करिनानंतर आता अभिनेता जावेद जाफरीचाही व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. त्याने निर्मात्यांबद्दल नाराजी व्यक्त करणारा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
अधिक वाचा :साडी नेसूनी नेहा पेंडसेने केले घायाळ
अलीकडेच आमिर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी एका पत्रकार परिषदेत एकत्र दिसले. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण या चित्रपटाचा सिक्वेल बनवणार असल्याचा अंदाज बांधत आहे. आता जावेद जाफरी यांचाही एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो निर्मात्यांवर सिक्वेलमधून खरा रँचो काढल्याचा आरोप करत आहे. जावेदचा हा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आमिर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ एका जाहिरातीशी संबंधित आहे, ही संपूर्ण योजना केवळ प्रमोशनसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे 3 इडियट्सच्या सिक्वेलच्या वृत्तावर सध्या पाणी फेरले आहे.
अधिक वाचा :कुठं कुठं जायचं हनिमूनला, काय ड्रेस घालायचा विचारा जेनिफरला