[PHOTO] शिल्पा शेट्टीच्या या हॉट फोटोंनी चाहते घायाळ

Shilpa Shetty Hot Photos: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने गोव्यातील आपले हॉट फोटो शेअर केले आहेत. पाहा तिच्या मादक अदा. 

shilpa shetty
[PHOTO] शिल्पा शेट्टीच्या या हॉट फोटोंनी चाहते घायाळ  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने शेअर केले आपले हॉट फोटो
  • शिल्पा शेट्टीच्या नवीन फोटोंची सोशल मीडियात जोरदार चर्चा 
  • शिल्पा शेट्टी गोव्यात करत आहे सुट्टी एन्जॉय 

पणजी: Shilpa Shetty Hot Photos from GOA: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (shilpa shetty) 45 ​​वर्षांची झाली आहे. पण आजही तिच्या हॉटनेसची जोरदार चर्चा असते. अलीकडेच तिने जे नवीन फोटो शेअर केले आहेत त्यावरुन तिच्या हॉटनेसचा आपल्याला अंदाज येतो. (Shilpa Shetty Bold  photos) शिल्पा शेट्टी सध्या  गोव्यात (Goa) सुट्टी एन्जॉय करत आहे. ती तिचे नवीन वर्षही येथे साजरं करणार आहे. शिल्पा शेट्टी यांनी बुधवारी तिच्या इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले असून त्यामध्ये ती Monokini मध्ये दिसली आहे. तिचे हे फोटो खूपच हॉट आहेत. हेच कारण आहे की काही तासात या फोटोला लाखो लाइक्स मिळाले आहेत.

शिल्पा शेट्टीने तिचे हे फोटो शेअर केल्यानंतर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही देखील आश्चर्यचकित झाली.  शिल्पाच्या या फोटोवर कमेंट करताना जॅकलिन म्हणाली की, 'ओह माय गॉड' त्याचवेळी पती राज कुंद्राने तिच्या फोटोवर म्हटलं आहे की, 'तू माझी आहेस, माझी आहेस, माझी आहेस', शिल्पाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत.

शिल्पा शेट्टी फिटनेस आणि हॉटनेसच्या बाबतीतही २६ वर्षीय अभिनेत्रींना देखील भारी पडत आहे. वाढत्या वयाचा तिच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम झालेला नाही. योग, व्यायाम आणि डाएटच्या बळावर ती अजूनही तरूण असल्याचं दिसून येत आहे. इन्स्टाग्रामवर तिला कोट्यावधी जण फॉलो करतात आणि ती त्यांच्यासाठी एकाहून एक हॉट फोटो शेअर करते.

शिल्पा शेट्टीने आपल्या हॉट आणि मादक अदांनी चाहत्यांना घायाळ करण्याची ही काही पहिली वेळ नाही. ती बर्‍याचदा असे करते. ती सहसा पती आणि कुटूंबीयांसह हँगआऊट करण्यासाठी बाहेर जात असते आणि बिकिनीमध्ये फोटो शेअर करते. शिल्पा आता मोठ्या पडद्यावर कमी दिसत आहे पण सोशल मीडियावर ती खूपच अॅक्टिव्ह असते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी