Soorarai Pottru Facts: 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. तमिळ चित्रपट सूरराई पोट्रूने (Soorarai Pottru) या वर्षी सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटासह अनेक पुरस्कार जिंकले आहेत. या चित्रपटातील प्रमुख अभिनेता सूर्याला (Actor Suriya) सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर अभिनेत्री अपर्णा बालमुरली (Aparna Balamurli) हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. 2020 मध्ये, दिवाळीच्या मुहूर्तावर सूरराई पोट्रू OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर रिलीज करण्यात आला. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता परेश रावल यांचीही महत्त्वाची भूमिका होती. सुधा कोंगारा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ( 68 National film awards 2022 actor suriya got best actor award for tamil film soorarai pottru)
अधिक वाचा : सनम खानच्या सौदर्यापुढे स्टार किड्सही फिके
सूरराई पोट्रू हा तामिळ शब्द आहे, ज्याचा अर्थ 'वीरांचा जयजयकार'असा होतो. चित्रपटाची कथा एअर डेक्कनचे संस्थापक कॅप्टन जी.आर. गोपीनाथ यांच्या जीवनावर आधारित आहे. ज्यांनी देशातील सामान्य माणसाचे विमान प्रवासाचे स्वप्न पूर्ण केले. हा चित्रपट 78 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यातही रिलीज झाला आहे. IMDB मध्ये एक लाख 11 हजार 639 मतांवर आधारित या चित्रपटाचे रेटिंग 10 पैकी 8.7 आहे. सूरराई पोट्रूची निर्मिती ऑस्कर विजेते निर्माते गुनीत मोंगा आणि सूर्या यांनी संयुक्तपणे केली आहे.
सूरराई पोट्रूचे स्क्रिनिंग 93 व्या अकादमी अवॉर्ड्स म्हणजेच ऑस्कर अवॉर्ड्समध्ये आयोजित करण्यात आले होते. मात्र, हा चित्रपट नामांकनाच्या शर्यतीतून बाहेर पडला होता. सूरराई पोट्रूचा हिंदी रिमेकही बनवला जात आहे. हिंदी रिमेकमध्ये अक्षय कुमार (Akshay Kumar) प्रमुख भूमिकेत असणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार,या चित्रपटाचे नाव स्टार्टअप असू शकते. मात्र, त्याची पुष्टी झालेली नाही. अक्षय कुमारशिवाय या चित्रपटात राधिका मदन देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हिंदी रिमेकमध्ये अभिनेता सूर्या एका छोट्या भूमिकेत दिसणार आहे.
अधिक वाचा : Whatsapp Hack, महिलांशी केले धक्कादायक कृत्य
सूर्याने सोशल मीडियावर चित्रपटातील कॅमिओची घोषणा केली होती. त्याचबरोबर या चित्रपटाच्या माध्यमातून सूर्या हिंदी मार्केटमध्ये निर्माता म्हणून पदार्पण करणार आहे. सूर्याच्या प्रोडक्शन हाऊस 2D एंटरटेनमेंट अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. सुधा कोंगरा या चित्रपटाच्या हिंदी रिमेकचे दिग्दर्शनही करणार आहेत.