सुशांतच्या 'दिल बेचारा' पासून तर अक्षयच्या 'लक्ष्मी बॉम्ब' पर्यंत, या ७ फिल्म्स रिलीज होणार ओटीटीवर

7 Bollywood Movies OTT release: आगामी काळात बॉलिवूडचे ७ मोठे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. कोरोना व्हायरसचं संकट अजून भारतात कायम आहे, त्यामुळे चित्रपटगृहं बंदच आहेत. आता ओटीटीवर रिलीज होणार आहेत.

OTT Films
सुशांत सिंह राजपूतचा अखेरचा चित्रपट ओटीटीवर होणार रिलीज  

थोडं पण कामाचं

  • लॉकडाऊनमुळे अनेक बॉलिवूड चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज
  • मागील तीन महिन्यांपासून बॉक्स ऑफिसला कुलूप, तब्बल ७ चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्याच्या मार्गावर
  • अमिताभ बच्चन-आयुष्मान खुराणाच्या 'गुलाबो-सिताबो' चित्रपटाला ओटीटीवर मिळाला चांगला रिस्पॉन्स

मुंबई: कोरोना व्हायरसच्या संकटामुळे संपूर्ण देश लढत आहे. कोरोनामुळे सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. कोरोना लॉकडाऊनचा परिणाम बॉलिवूडवर (Bollywood) पण मोठ्या प्रमाणात झालाय. लॉकडाऊनमुळे मागील तीन महिन्यांपासून एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) झळकू शकला नाहीय. चित्रपटगृह बंद असल्यामुळे फिल्ममेकर्स आपले चित्रपट रिलीज करण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा (OTT Platform) वापर करतांना दिसतायेत. १२ जूनला अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराणा यांचा चित्रपट ‘गुलाबो-सिताबो’ पण ओटीटीवर रिलीज झाला होता. चित्रपटला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. आता जाणून घेऊया आणखी कोणते चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहेत ते..

ओटीटी प्लॅटफॉर्मवर पुढील महिन्यात काही चित्रपट रिलीज होणार आहेत. त्यात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा अखेरचा चित्रपट ‘दिल बेचारा’, अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’, आलिया भट्टचा ‘सडक-२’, अभिषेक बच्चनचा ‘बिग बुल’, कुणाल खेमूचा ‘लुटकेस’, विद्युत जामवालचा ‘खुदा हाफिज’ आणि अजय देवगणचा ‘भुज द प्राईड ऑफ इंडिया’ या चित्रपटांचा समावेश आहे.

‘दिल बेचारा’ हा अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा अखेरचा चित्रपट आहे, जो जुलैमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री संजना संघी दिसणार आहे. हा चित्रपट मुकेश छाबडा यांनी बनवलाय.

तर अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाची प्रेक्षक खूप काळापासून वाट बघत आहेत. हा चित्रपट ईदच्या निमित्तानं रिलीज होणार होता. पण लॉकडाऊनमुळे ते शक्य झालं नाही. ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटात अक्षय कुमारच्या अपोझिट अभिनेत्री कियारा आडवाणी आहे. चित्रपटात अक्षय कुमार ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत आहे. याशिवाय आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त आणि पूजा भट्ट यांचा चित्रपट ‘सडक-२’ पण पुढील महिन्यात रिलीज होणार होता. पण चित्रपटगृह बंद असल्यामुळे मेकर्स आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करणार आहेत. सडक-२ १९९१ साली आलेला चित्रपट सडकचा सिक्वेल आहे, ज्यात पूजा भट्ट आणि संजय दत्त प्रमुख भूमिकेत होते.

‘भुज: द प्राईड ऑफ इंडिया’मध्ये अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, नोरा फतेही, शरद केळकर, एमी विर्क आणि प्रणिता सुभाष पण दिसणार आहे. ‘बिग बुल’मध्ये अभिषेक बच्चन शिवाय निकिता दत्ता, इलियाना डिक्रूज, सुमित वत्स, राम कपूर, सोहम शाह, लेखा प्रजापति आपल्या अभिनयाचा जलवा दाखवतील. ‘खुदा हाफिज’मध्ये विद्युत जामवाल, शिवालेका ओबेरॉय आणि अन्नू कपूर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी