Bipasha Basu : सात महिन्यांच्या प्रेग्नंट बिपाशा बासूचा बेधडक डान्स, चाहते म्हणाले "बिप्स,जरा जपून"

बी टाऊन
Updated Nov 07, 2022 | 16:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bipasha Basu : काही दिवसांपूर्वीच बिपाशा बासूचा (Bipasha Basu) एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.या व्हिडिओमध्ये बिपाशा बसू पती करणसोबत जबरदस्त डान्स (Bipasha Basu Dance) करताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काहींनी चांगल्या कमेंट्स दिल्या आहेत तर काहींनी बिपाशावर टीकाही केलेली आहे

 7 month pregnant bipasha basu and karan dancing video viral
बिपाशा बासूचा बेधडक डान्स  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बिपाशा-करणचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
  • बिपाशाचा बेधडक डान्स, चाहते हैराण
  • लवकरच बिपाशा बासू होणार आई

Bipasha Basu : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. कधी ती तिच्या बेबी बंपचा फोटो शेअर करते तर कधी तिच्या बोल्ड कपड्यांमुळे तिला ट्रोल केले जाते. आशातच, बिपाशा बासूचा एक डान्स (Bipasha Basu Dance) व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये बिपाशा एका इंग्रजी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिचा डान्स आणि स्टाइल पाहून चाहते पुरते हैराण झाले आहेत. ( 7 month pregnant bipasha basu and karan dancing video viral)

अधिक वाचा : ... अब्दू रोजिक-शिव ठाकरेची धमाल कॉमेडी

बिपाशा बसूचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बिपाशा बसू ब्लॅक कलरच्या वन पीसमध्ये दिसत आहे. तिचा हा डान्स पाहून, डान्स स्टेप्स पाहून चाहते आश्चर्यचकीत झाले आहेत. अर्थातच त्याचं कारणही तसंच आहे. बिपाशा बासू 7 महिन्यांची प्रेग्नंट आहे. लवकरच ती आई होणार आहे. अशावेळी बिपाशाचा हा डान्स पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. डान्स करताना बिपाशा अजिबात थकलेली दिसत नाही. ती करणसोबत स्विंग करतानाही दिसत आहे. 

अधिक वाचा : बिग बॉसच्या घरात रंगणार 'विषय END' नॉमिनेशन टास्क


दोघांचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलेला आहे. एका चाहत्याने कमेंट केली की, तू तुझं मन प्रसन्न ठेवतेस, हे खूप चांगलं आहे, तर दुस-या चाहत्याने कमेंट केली की," तू निदान तुझ्या तब्येतीची तरी काळजी घे, अशा स्थितीत असं नाचणं योग्य नाही". तर अजून एकाने म्हटलंय, मस्त.. ". बिपाशा बासू देखील लवकरच आई होणार आहे. बिपाशा बासूआधी सोनम कपूर आणि आलिया भट्टही आई झाल्या आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांकडून त्याचे जोरदार अभिनंदन होत आहे. बिपाशाच्या प्रसूतीबद्दल बोलायचे झाले तर ती पुढच्या वर्षी बाळाला जन्म देणार आहे. सध्या बिपाशा 7 महिन्यांची प्रेंग्नंट आहे आणि म्हणूनच तब्बेतीची काळजी घेण्याचा प्रेमळ सल्ला बिप्सच्या चाहत्यांकडून तिला दिला जात आहे. 


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी