Rajesh Khanna Biopic: सुपरस्टार राजेश खन्नाचं जीवनपट सिल्व्हर स्क्रीनवर येणार, फराह खान बनवणार बायोपिक

बी टाऊन
Updated Dec 29, 2021 | 12:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rajesh Khanna Biopic: भारतातील पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांचा बायोपिक लवकरच सिल्व्हर स्क्रीनवर दिसणार आहे.फराह खान या बायोपिकचे दिग्दर्शन करणार आहे.

A biopic on Bollywood first superstar Rajesh Khanna's life
राजेश खन्नाच्या जीवनावर येणार बायोपिक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राजेश खन्ना यांना भारताचे पहिले सुपरस्टार म्हटले जाते.
  • राजेश खन्ना यांचा बायोपिक लवकरच सिल्व्हर स्क्रीनवर
  • राजेश खन्ना यांच्या बायोपिकचे दिग्दर्शन फराह खान करणार आहे.

Rajesh Khanna Biopic: मुंबई :   राजेश खन्ना यांच्या ७९व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. काका या नावाने प्रसिद्ध असलेल्या राजेश खन्ना यांचा बायोपिक लवकरच सिल्व्हर स्क्रीनवर येणार आहे. रिपोर्ट्सनुसार, फराह खान या बायोपिकचे दिग्दर्शन करणार आहे. राजेश खन्ना यांनी सलग १७ मोठे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले होते. 

निर्माते निखिल द्विवेदी यांनी गौतम चिंतामणीच्या डार्क स्टार: द लोनलीनेस ऑफ बिइंग राजेश खन्ना याचे हक्क विकत घेतले आहेत, आणि आता त्यावरच सिनेमा येणार आहे. 
फराह खान गौतम चिंतामणीसोबत स्क्रिप्ट लिहिणार आहे. राजेश खन्ना यांची भूमिका कोण साकारणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. राजेश खन्ना यांच्याबद्दल एवढी क्रेझ होती की त्यांच्या महिला चाहत्या  त्यांना रक्ताने पत्र लिहित असत.त्यांच्या फोटोसोबत लग्नही करायच्या. 

Rajesh Khanna lived king size till the end, reveals his close friend –  Exclusive! | Hindi Movie News - Times of India

निखिल आणि फराहने ही गोष्ट सांगितली

निखिल द्विवेदी म्हणतो, 'होय, गौतम चिंतामणीच्या 'डार्क स्टार' या पुस्तकाचे हक्क आता माझ्याकडे आहेत आणि हा चित्रपट बनवण्यासाठी माझी फराह खानशी चर्चा सुरू आहे. मी सध्या एवढेच सांगू शकतो. चित्रपटाबाबत एक मोठी घोषणा होताच, मी ती नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. फराह खान म्हणाली, 'होय मी गौतमचे पुस्तक वाचले आहे आणि ते खूप आकर्षक आहे. यावर सध्या आमची चर्चा सुरू आहे, मी अधिक भाष्य करू शकत नाही.'

Rajesh Khanna was very shy person: Saira Banu | Hindi Movie News - Times of  India


आखिरी खत या सिनेमातून राजेश खन्ना यांनी डेब्यू केला होता

चेतन आनंदच्या आखरी खत (1966) मधून पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्याला यापूर्वी कधीही न पाहिलेले यश तसेच अपयशही पदरी आले. जतिन खन्ना नावाने जन्मलेल्या अभिनेत्याला लोक इंडस्ट्रीत काका या नावाने हाक मारायचे.

Rajesh Khanna hale and hearty, says son-in-law Akshay Kumar - Movies News


गौतम चिंतामणीच्या पुस्तकात या अभिनेत्याच्या स्वभावाचे अनेक पैलू मांडण्यात आले आहेत. निखिल द्विवेदी निर्मित या बायोपिकच्या माध्यमातून हेच अनेक भिन्न पैलू सि्ल्हर स्क्रीनवर आणले जाणार आहेत, जी भारताच्या या पहिल्यावहिल्या सुपरस्टारला श्रद्धांजली असेल.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी