न्यूड फोटोशूटमुळे दुखावल्या महिलांच्या भावना; रणवीर सिंगविरोधात मुंबईत गुन्हा दाखल

बी टाऊन
भरत जाधव
Updated Jul 26, 2022 | 07:29 IST

बॉलिवूडचा (Bollywood) स्टाइल ऑयकॉन असलेला अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) सध्या त्याच्या न्यूड फोटोंशूटमुळे (Nude Photoshoot) चर्चेत आला आहे. रणवीरने 'पेपर' या मासिकासाठी केलेलं न्यूड फोटोशूट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

A case has been registered against Ranveer Singh in Mumbai
रणवीर सिंगविरोधात मुंबईत गुन्हा दाखल   |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • सेवाभावी संस्थेने दिलेल्या तक्रारीवरून चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.
  • सर्वत्र रणवीरच्या न्यूड फोटोशूटचीच चर्चा
  • रणवीरच्या फोटोशूटचे काहींनी कौतुक केलं आहे. मात्र, काहींनी केलीय टीका.

Ranveer Singh Police Complaint: बॉलिवूडचा (Bollywood) स्टाइल ऑयकॉन असलेला अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) सध्या त्याच्या न्यूड फोटोंशूटमुळे (Nude Photoshoot) चर्चेत आला आहे. रणवीरने 'पेपर' या मासिकासाठी केलेलं न्यूड फोटोशूट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. परंतु अभिनेता रणवीर सिंग याला न्यूड फोटोशूट चांगलंच महागात पडलं आहे. रणवीरविरुद्ध एका सेवाभावी संस्थेने दिलेल्या तक्रारीवरून चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये (Chembur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणवीर याने न्यूड फोटोशूट करून भारतीय संस्कृतीचे उल्लंघन केले असून महिलांच्या भावना दुखावल्याचा आरोप (Mumbai Police) करण्यात आला आहे.

बॉलिवूडचा बाजीराव समजला जाणारा रणवीर सिंग याने न्यूड फोटोशूट करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. सध्या सर्वत्र रणवीरच्या न्यूड फोटोशूटचीच चर्चा आहे. रणवीरचा न्यूड फोटोशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. रणवीरच्या फोटोशूटचे काहींनी कौतुक केलं आहे. मात्र, काहींनी त्याच्यावर कडाडून टीका देखील केली आहे. रणवीर सिंगने केलेल्या न्यूड फोटोशूटनंतर तो सातत्यानं वादात सापडताना दिसत आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतरही यामागे काहीतरी राजकारण सुरू झाल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. काही राजकारण्यांनीही रणवीरच्या फोटोंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

Read Also : देसी तूप आणि काळी मिरी खाण्याचे आहेत अतुलनीय फायदे

दरम्यान चेंबुर पोलीस स्टेशनमध्ये रणवीरविरोधात थेट गुन्हा दाखल झाला आहे. रणवीरच्या विरुद्ध भादंवि कलम 67 A, कमल 292, 293, 354 आणि 509 नुसार भावना दुखावल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. रणवीरने भारतीय संस्कृतीचे उल्लंघन केले असून त्याने महिलांच्या भावना दुखावल्या आहेत. आपला देश हा संस्कृतीचं जतन, पूजा करणारा देश आहे.

Read Also : विषारी दारूमुळे मृत्यूचं तांडव; ९ जणांचा मृत्यू

देशात प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. परंतु या स्वातंत्र्याचा कुठे तरी गैरवापर होत आहे. देशात अभिनेत्याला नायक संबोधले जाते. नायकाला शेकडो काय लाखो चाहते असतात. ते त्या नायकाचे अनुकरण करत असतात. त्यामुळे रणवीरने केले न्यूट फोटोसूट करणे चुकीचं असल्याचे तक्रारदार संस्थेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

Read Also : तुम्हालाही 'तसे' स्वप्न पडतात? त्याचा अर्थ अन् लक्षणे काय?

न्यूड फोटोशूट घालतोय धुमाकूळ…

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याने नुकतेच एका मॅगझीनच्या कव्हरपेजसाठी न्यूड फोटोशूट केले आहे. त्यावरून त्याने नवा वाद ओढवून घेतला आहे. विशेष म्हणजे त्याच्या फोटोशूटने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. फोटोशूटमध्ये रणवीरने विवस्त्रावस्थेत टर्किश गालीच्यावर झोपून बसून विविध पोझ दिल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी