Aamir Khan in Mogul: गुलशन कुमार यांच्या बायोपिक 'मोगल'मधून आमिर खानचं कमबॅक

बी टाऊन
Updated Sep 10, 2019 | 12:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

बॉलिवूडमध्ये #Metoo चळवळ सुरु झाली आणि त्यात दिग्दर्शक सुभाष कपूरचं नाव सुद्धा जोडलं गेलं. त्यानंतर तो दिग्दर्शित करत असलेल्या मोगल सिनेमातून आमिर खानने काढता पाय घेतला. आता आमिरने त्याचा निर्णय बदलला आहे.

aamir khan decides to work back in mogul after walking out of the film last year
Aamir Khan in Mogul: गुलशन कुमार यांच्या बायोपिक 'मोगल'मध्ये आमिर खान पुन्हा झळकणार 

थोडं पण कामाचं

  • काढता पाय घेतलेल्या मोगल सिनेमात आमिर खान झळकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज
  • दिग्दर्शक सुभाष कपूरचं Metooमध्ये नाव आल्याने घेतला होता निर्णय
  • पत्नी किरणसोबत फेर विचार करत आमिरने घेतला नवीन निर्णय

मुंबई: बॉलिवूडमध्ये मध्यंतरी #Metoo चळवळीमुळे बराच गदारोळ माजला. अनेक दिग्गजांची नावं सुद्धा यात समोर आली. त्यानंतर बऱ्याच चर्चा रंगल्या, बरेच सिनेमे रखडले, काही ठिकाणी तर मोठ-मोठ्या प्रॉडक्शन हाऊसला सुद्धा फटका बसला, जसा फँटम फिल्म्स. यातच एका मोठ्या प्रोजेक्टच्या दिग्दर्शकाचं नाव सुद्धा जोडलं गेलं. गुलशन कुमार यांच्या आयुष्यावर आधारित मोगल सिनेमाचा दिग्दर्शक सुभाष कपूर याचं नाव #Metooमध्ये आल्यामुळे परफेक्शनिस्ट आमिर खानने सिनेमातून काढता पाय घेतला. आमिर सिनेमात मुख्य भूमिका साकारणार होता पण त्याने यावर आपला निर्णय दिला आणि तो सिनेमातून बाहेर पडला. आता मात्र त्याने त्याचा निर्णय बदलला आहे.

त्यावेळी सुभाष याच्या विरोधात केलेल्या आरोपांमुळे आमिर आणि पत्नी किरण राव यांना धक्का बसला होता आणि त्यांनी तेव्हा तो निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. आता मात्र आमिरने या सिनेमावर फेरविचार केला आहे आणि आता तो या सिनेमात झळकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. यावर आमिरने असं स्पष्टीकरण दिल्याचं समजतंय की गुन्हा जोपर्यंत सिद्ध होत नाही तोवर एखाद्याला दोषी ठरवता येत नाही. सुभाष याने सगळे आरोप फेटाळल्यामुळे पुढचा निर्णय कोर्ट घेईल असं सुद्धा आमिरचं मत आहे. त्याशिवाय आमिरनं मोगल सिनेमाला अलविदा केल्यानं सुभाषकडून इतर खूप मोठे प्रोजेक्टसुद्धा निघून गेले असं आमिरचं म्हणणं आहे. या सगळ्यावर अधिक व्यक्त होत एका प्रसिद्ध पब्लिकेशनला दिलेल्या एका मुलाखतीत आमिर म्हणाला, “आम्ही (किरण आणि आमिर स्वतः) बऱ्याच महिन्यांसाठी खूप त्रासलेल्या परिस्थितीत होतो. मी रात्री झोपू शकत नव्हतो कारण मी सतत विचार करत होतो की माझ्यामुळे नकळतपणे एका माणसाला ज्याच्या गुन्ह्याबद्दल अजून मला स्वतःला पण खात्री नाही आहे, त्याचा काम करण्याचा हक्क आणि उपजीविका कमावण्याचा हक्क हिरावला जात आहे” आमिरचं असं मत आहे की कोर्टाकडून अंतिम निर्णय आल्याशिवाय एखाद्याला गुन्हेगार ठरवणं आणि त्यामुळे त्याला काम न देणं खूप चुकीचं आहे.

सुभाष कपूर

या सगळ्यात त्याचा निर्णय बदलण्यामागे नेमकं काय कारण होतं हे सांगताना आमिर म्हणाला की, मे महिन्यात त्याला इंडियन फिल्म अण्ड टेलिव्हिजन डिरेक्टर्स असोशिएशन (आयएफटीडीए) एक पत्र आलं ज्यामध्ये कपूरच्या केसबाबत असं लिहिलं होतं की कोर्टात अंतिम निर्णय येईपर्यंत त्याला दोषी ठरवणं चुकीचं आहे. तो सध्या तरी निर्दोष आहे आणि म्हणून त्याने काम गमावणं चुकीचं आहे. हे वाचल्यावर कुठेतरी आमिरचा निर्णय बदलण्यासाठी मदत झाली पण तरीही तो आणि किरण कुठेतरी ठाम नव्हती की त्यांचा निर्णय बरोबर आहे का. त्यामुळे या दोघांनी काही महिलांची भेट घेतली ज्यांनी या आधी सुभाषसोबत काम केलं होतं.

त्यानंतर काय झालं त्यावर आमिर म्हणतो, “आम्हाला या लक्षात आलं, की कोणत्याही अपेक्षेशिवाय त्या सगळ्यांनीच त्याच्याबद्दल खूप चांगलं मत दिलं. त्यांना कोणालाच त्याच्यासोबत काम करण्यात काहीच विचित्र तर वाटलं नाहीच पण त्यापुढे जाऊन त्यांनी त्याची स्तुती केली. त्यांनी असं पण सांगितलं की तो सगळ्यांची सेटवर खूप काळजी घ्यायचा.” या सगळ्या गोष्टींचा नीट विचार केल्यावर आमिरनं आयएफटीडीएला कळवलं की, तो मोगल सिनेमात पुन्हा काम करण्यासाठी तयार आहे. हे सगळं असलं तरी या सिनेमावर अद्यापतरी काम सुरू होऊ शकणार नाहीय कारण सध्या आमिर लाल सिंग चढ्ढा सिनेमामध्ये बिझी आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...