मुख्यमंत्र्यांना भेटून आलेल्या आमिर खानला झाला कोरोना

बॉलिवूड अभिनेता आमिर खान याला कोरोना झाला. तो होम क्वारंटाइन झाला आहे. याआधी आमिर खान सोमवारी २२ मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटला होता

Aamir Khan tests positive for coronavirus days after meeting CM Uddhav Thackeray
मुख्यमंत्र्यांना भेटून आलेल्या आमिर खानला झाला कोरोना 

थोडं पण कामाचं

 • मुख्यमंत्र्यांना भेटून आलेल्या आमिर खानला झाला कोरोना
 • आमिर खान सोमवारी २२ मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटला होता
 • आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांना कोरोना

मुंबईः बॉलिवूड अभिनेता आमिर खान याला कोरोना झाला. तो होम क्वारंटाइन झाला आहे. याआधी सोमवारी २२ मार्च रोजी जागतिक जल दिनाच्या निमित्ताने पाणी फाउंडेशनचा एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमिर खान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटला होता. (Aamir Khan tests positive for coronavirus days after meeting CM Uddhav Thackeray)

आधीच मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे तसेच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना कोरोना झाला आहे. दोघांनी स्वतःला होम क्वारंटाइन करुन घेतले आहे. सध्या आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे वैद्यकीय सल्ल्याने उपचार घेत आहेत. या वातावरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २२ मार्च रोजी भेटलेल्या अभिनेता आमिर खान याची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त आज (बुधवार, २४ मार्च २०२१) जाहीर झाले आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चिंतेत भर पडली आहे.

कोरोना संकट सुरू झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भर घरातून फोनवर संपर्क साधून तसेच व्हिडीओ कॉन्फरन्स करुन राज्याचा कारभार हाताळण्यावर राहिला आहे. मागील काही दिवसांत तर मुख्यमंत्री घराबाहेर जास्त पडलेले नाही. पण घरातच दोन सदस्यांना कोरोना झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे. कोरोना संकटामुळे या संघर्षाची तीव्रता कमी होणार की कोरोना संकट हाताळण्याचे अपयश आणि इतर कामकाजातही अपयशाचे आरोप करत विरोधक ठाकरे सरकार विरोधात आणखी आक्रमक होणार हे चित्र पुढील काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

कोरोना संकटाची वाढती तीव्रता

 1. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात वाढत्या कोरोना संकटामुळे २६ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीसाठी लॉकडाऊन जाहीर
 2. महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य उद्धव ठाकरे, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी उद्धव ठाकरे यांना कोरोना झाला
 3. महाराष्ट्रात २३ मार्च २०२१च्या संध्याकाळपर्यंत २ लाख ३० हजार ६४१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली
 4. महाराष्ट्राचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर अर्थात रिकव्हरी रेट ८८.७३ टक्के
 5. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यू दर २.१२ टक्के
 6. महाराष्ट्रात ११ लाख ७७ हजार २६५ जण होम क्वारंटाइन आणि ११ हजार ८८७ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये
 7. शब-ए-बारात संदर्भात महाराष्ट्राच्या गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी
 8. वाढत्या कोरोना संकटामुळे सर्वधर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्याचे ठाकरे सरकारचे आवाहन
 9. मास्क वापरा, सोशल डिस्टंस राखा आणि गर्दी टाळा
 10. संपूर्ण महाराष्ट्रात कोविड प्रोटोकॉल लागू
 11. कोरोना संकटामुळे महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे लागू असलेल्या फौजदारी दं.प्र.सं. कलम १४४ अन्वये जारी केलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचे ठाकरे सरकारचे नागरिकांना आवाहन
 12. शब-ए-बारात दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या वाझ या कार्यक्रमाचे आयोजन शक्यतो बंदीस्त जागेत करण्याचे आयोजकांना राज्य सरकारचे आवाहन

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी