KBC 14: केबीसीच्या पहिल्या एपिसोडमध्ये अमिताभसोबत दिसणार आमीर खान, 'लाल सिंग चड्ढा'चे करणार प्रमोशन

बी टाऊन
Updated Jul 15, 2022 | 17:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

Aamir Khan to join KBC 14 First Episode: बॉलिवूड अभिनेता आमीर खान कौन बनेगा करोडपती सीझन 14 च्या मंचावर त्याच्या आगामी 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसणार आहे.

Aamir Khan to appear with Amitabh in first episode of KBC, to promote 'Lal Singh Chadha'
केबीसीच्या नव्या सीझनमध्ये आमीर खानची हजेरी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कौन बनेगा करोडपतीच्या 14व्या सीझनसह अमिताभ पुनरागमन करणार आहेत.
  • आमीर त्याच्या आगामी 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटाचे प्रमोशन स्टेजवर करताना दिसणार आहे.
  • आमीर पहिल्या एपिसोडमध्ये सहभागी होणार असून हॉट सीटवर बसलेला दिसणार आहे.

Aamir Khan to join KBC 14 First Episode: बॉलिवूचे शहंशाह अमिताभ बच्चन लवकरच कौन बनेगा करोडपतीच्या 14व्या सीझनसह पुनरागमन करणार आहेत. कौन बनेगा करोडपतीचा पहिला सीझन 2000 मध्ये टेलिकास्ट झाला होता. तेव्हापासून एकच सीझन सोडून अमिताभ बच्चन केबीसी होस्ट करत आहेत. 2021 कौन बनेगा करोडपती सीझन 13 मध्ये, हिमानी बुंदेला, साहिल अहिरवार आणि गीता सिंग गौर या तीन स्पर्धकांनी एक कोटी रुपये जिंकले.

आता केबीसीच्या या नव्या सीझनची तयारी पूर्ण झाली आहे. बॉलिवूड अभिनेता आमिर खान कौन बनेगा करोडपती सीझन 14 च्या मंचावर त्याच्या आगामी 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसणार आहे. आमीर खान 'कौन बनेगा करोडपती 14' या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये सहभागी होणार असून हॉटसीटवर बसलेला दिसणार आहे.

KBC 14 चे नियम बदलले


या सीझनमध्ये शोमध्ये बरेच नवीन नियम समाविष्ट केले जाणार आहेत. सोनी टीव्हीवर रिलीज झालेल्या केबीसीच्या नवीन प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन स्पर्धकांना सांगतात, 'जर तुम्ही खेळलात आणि योग्य उत्तर दिले तर तुम्ही साडेसात कोटी जिंकाल' असे दाखवण्यात आले आहे. स्पर्धक पुढे खेळायचे की नाही या विचारात पडतो. यानंतर बिग बी पुढे म्हणतात, 'त्याचवेळी, दुर्दैवाने, जर प्रश्नाचे उत्तर चुकीचे असेल, तर तुम्हाला 75 लाख रुपये नक्कीच मिळतील. यंदा देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना केबीसीमध्ये एक नवीन टप्पा जोडला जात आहे.


11 ऑगस्टला रिलीज होणार लाल सिंग चड्ढा सिनेमा


आमिर खान प्रॉडक्शन, किरण राव आणि वायकॉम 18 स्टुडिओज निर्मित लाल सिंग चड्ढा, करीना कपूर खान, मोना सिंग आणि चैतन्य अक्किनेनी यांच्याही भूमिका आहेत. 
हा चित्रपट १९९४ मध्ये रिलीज झालेल्या फॉरेस्ट गंपचा अधिकृत रिमेक आहे. लाल सिंग चड्ढा 11 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होणार आहे.


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी