Amir Khan Daughter: आमिर खानची मुलगी इरा खान या आजाराचा करतेय सामना; तिच्या बॉयफ्रेंड बद्दल लिहला हा मेसेज

बी टाऊन
Updated May 04, 2022 | 12:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

Amir Khan Daughter | बॉलिवूड मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खानची मुलगी इरा खान (Ira Khan) नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते. ती तिच्या सोशल मीडिया हँडलवर अनेकदा काही ना काही फोटो शेअर करत असते.

Aamir Khan's daughter Ira Khan is battling the disease
आमिर खानची मुलगी इरा खान या आजाराचा करतेय सामना  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आमिर खानची मुलगी इरा खान नेहमीच चर्चेत असते.
  • यावेळी अभिनेत्रीने तिची वैयक्तिक गोष्ट लोकांसोबत शेअर केली आहे.
  • इरा खानने लांबलचक इंस्टाग्राम पोस्ट लिहली आहे.

Ira Khan | नवी दिल्ली : बॉलिवूड मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खानची मुलगी इरा खान (Ira Khan) नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते. ती तिच्या सोशल मीडिया हँडलवर अनेकदा काही ना काही फोटो शेअर करत असते. पण यावेळी अभिनेत्रीने तिची वैयक्तिक गोष्ट लोकांसोबत शेअर केली आहे. खर तर इरा खानने तिच्या डिप्रेशन बद्दल भाष्य केले आहे. सध्या तिची ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे. (Aamir Khan's daughter Ira Khan is battling the disease). 

काही काळापूर्वी इराने सांगितले होते की ती डिप्रेशनची शिकार झाली आहे. तसेच इरा खानने आता तिच्या आणखी एका डोकेदुखीचा खुलासा केला आहे. अलीकडेच सोशल मीडियाच्या माध्यमातून इरा खानने सांगितले की, तिला आता डिप्रेशनचे (Ira Khan anxiety attacks) झटके येत आहेत. 

अधिक वाचा : बांगलादेशी गोलंदाज मुस्तफिजुर रहमान ईदच्या फोटोंवरून ट्रोल

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

इराने पोस्टमध्ये काय लिहले

इरा खानने तिच्या लांबलचक इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहले की, "मला आता डिप्रेशनचे झटके येऊ लागले आहेत, मला भीती वाटते आणि कधी कधी रडायलाही येते. पॅनिक अटॅक कसा असतो हे मला माहीत नाही. मात्र जेवढे मला समजते त्यानुसार त्याची शारीरिक लक्षणे म्हणजे हृदयाचे ठोके वाढणे, श्वासोच्छवास वाढणे, रडणे इत्यादी आहेत जी हळूहळू वाढत जातात. ही खूप भीतीदायक भावना आहे. मला आता खरोखरच पुरेशी झोप हवी आहे परंतु चिंताग्रस्त वातावरणामुळे मला झोप येत नाही. मी आता माझी भीती ओळखण्याचा प्रयत्न करत आहे पण जेव्हा कधी ती येते तेव्हा ती थांबण्याचे नाव घेत नाही. अशा स्थितीत Popeye (नुपूर शिखरे) शी बोलण्याने आणि मोकळा श्वास घेतल्याने मला थोड्या प्रमाणात आराम मिळतो. 

अधिक वाचा : बांगलादेशी गोलंदाज मुस्तफिजुर रहमान ईदच्या फोटोंवरून ट्रोल

इरा खानने (Ira Khan) पोस्टमध्ये आणखी म्हटले की, सोबतच हे देखील या वस्तुस्थितीवर अवलंबून आहे की आणखी कोणती गोष्ट या बाबतीत मला ट्रिगर तर करत नाही ना. जर तुम्ही काळजी घेण्याचा प्रयत्न करत असाल तर या सर्व गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

नुपूर शिखरेला डेट करत आहे इरा

इराने या पोस्टमध्ये तिच्या अस्वस्थतेबद्दल बरेच काही लिहिले आहे. आता तिची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इरा खान काही दिवसांपासून फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेला डेट करत आहे. अनेकदा ती नुपूरसोबतचे तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी