Bollywood happening news : बॉलिवूडमध्ये सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. मग तो दीपिकाचा पठाणमधील स्टंट असो, किंवा आमीरच्या बहुचर्चित लाल सिंग चड्ढाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा विचार असो. अशाच काही हॅपनिंग न्यूज आपण पाहणार आहोत. ( Bollywood wrap )
अभिनेता आमिर खानच्या ( Aamir khan ) आगामी 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. रिपोर्ट्सनुसार, कोरोना आणि वाढत्या केसेस पाहता लवकरच निर्माते 'लाल सिंग चड्ढा'ची रिलीज डेट पुन्हा एकदा पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊ शकतात. निर्मात्यांनी हा सिनेमा यावर्षी 14 एप्रिलला बैसाखीच्या खास मुहूर्तावर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आता निर्माते हा चित्रपट दिवाळीच्या वीकेंडला रिलीज करण्याचा विचार करत आहेत. लाल सिंग चड्ढा हा हॉलिवूड फिल्म फॉरेस्ट गंपचा अधिकृत हिंदी रिमेक आहे.
दीपिका पदुकोणला ( Deepika padukon ) तिच्या सिनेमात स्टंट करायला आवडतात. त्यामुळेच ती स्वतः आगामी 'पठाण' चित्रपटासाठी स्टंट करत आहे. यासाठी तिने निर्मात्यांकडून डमी वापरणं नाकारले आहे. पठाणमध्ये दीपिकासोबत शाहरुख खानही (Shahrukh khan ) दिसणार आहे. या चित्रपटासाठी शाहरुख काही जोखमीचे अॅक्शन सीक्वेन्सही स्वत: शूट करणार आहे. 'पठाण'शिवाय दीपिकाने 'चांदनी चौक टू चायना' आणि 'कोचडियान'साठीही स्टंट केले आहेत.
चित्रपट निर्माते अनुराग कश्यपने ( Anurag Kashyap ) सोशल मीडियावर ( Social Media ) आपल्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना बनावट कास्टिंग टाळण्याचा इशारा दिला आहे. सोशल मीडियावर, राजबीर कास्टिंग नावाच्या वापरकर्त्याने अनुरागच्या सेक्रेड गेम्सच्या सीझन 3 चे कास्टिंग तपशील शेअर केले आहेत. त्यानंतर ती पोस्ट शेअर करताना अनुरागने लिहिले की, 'राजबीर कास्टिंग नावाचा हा माणूस खोटा आहे. कृपया या व्यक्तीच्या पोस्टची तक्रार करा. सेक्रेड गेम्सचा सीझन 3 आणण्याचा अद्याप तरी कोणताही विचार नाही. त्यामुळेच मी या व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करणार असल्याचं अनुराग कश्यप यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.'
अभिनेता अली फजलने ( Ali fazal ) त्याच्या आगामी 'कंधार' चित्रपटाच्या सेटवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो सहकलाकार नावेद निघाबान आणि जेरार्ड बटलरसोबत दिसत आहे. 'कंधार'ची कथा एका खऱ्या आयुष्यातील घटनेवर आधारित आहे. अफगाणिस्तानमधील डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीच्या माजी गुप्तहेराच्या जीवनानुभवातून ही कथा प्रेरित आहे. रिक रोमन वॉ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.