Laal Singh Chaddha Trailer:  आमीर खानच्या 'लाल सिंग चड्ढा'चा ट्रेलर आयपीएलच्या अंतिम फेरीत रिलीज होणार, मनोरंजनाचा डबल डोस

बी टाऊन
Updated May 21, 2022 | 17:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

Laal Singh Chaddha Trailer:  लाल सिंग चड्ढा'च्या ट्रेलर लॉन्चसाठी आमिर खानची एक मोठी, मनोरंजक आणि अनोखी योजना आहे. 29 मे रोजी तमाम क्रिकेट आणि सिनेप्रेमींना एक मोठे सरप्राईज मिळणार आहे.

Aamir Khan's 'Lal Singh Chadha' trailer to be released in IPL final
आपीएलच्या अंतिम सामन्यात लाल सिंग चड्ढाचा ट्रेलर लाँच होणार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आमिर खान 'लाल सिंग चड्ढा'चा ट्रेलर लॉन्च करणार आहे.
  • 29 मे रोजी तमाम क्रिकेट आणि सिनेप्रेमींसाठी एक मोठे सरप्राईज असणार आहे.
  • 'लाल सिंह चड्ढा'चा ट्रेलर आयपीएलच्या फायनल मॅचच्या दिवशी लॉन्च होणार आहे

Laal Singh Chaddha Trailer: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान प्रत्येक वेळी काहीतरी नवीन करत असतो. वेगवेगळ्या पात्रांसह प्रयोग करणे असो किंवा चित्रपटांसाठी भिन्न थीम निवडणे असो, चित्रपटाच्या जाहिरातीसाठी भिन्न कल्पना असोत, बॉलीवूडच्या या प्रतिभावान अभिनेत्याला वेगळे राहणे आवडते.


लाल सिंग चड्ढा या त्याच्या आतुरतेने वाट पाहत असलेल्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चसाठी सुपरस्टारकडे एक मोठी, मनोरंजक आणि अनोखी योजना आहे यात आश्चर्य नाही. ज्या अंतर्गत 29 मे रोजी सर्व क्रिकेट आणि सिनेप्रेमींसाठी एक मोठे सरप्राईज असणार आहे, कारण IPL च्या शेवटच्या दिवशी 'लाल सिंग चड्ढा' चा ट्रेलर लाँच होणार आहे.

चित्रपटाशी संबंधित असलेल्या एका सूत्राने सांगितले की, "जेव्हा आमिर खान असेल, तेव्हा याआधी कधीही न पाहिलेले काहीतरी घडेल. 'लाल सिंग चड्ढा'चा ट्रेलर २९ मे रोजी, आयपीएलच्या अंतिम फेरीच्या दिवशी लाँच केला जाईल. आयपीएलच्या उत्साहात, आमिर खान स्टारर चित्रपटाच्या निर्मात्यांनी जाणूनबुजून त्यांच्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे, जे चित्रपट आणि क्रिकेटच्या चाहत्यांसाठी आश्चर्यचकित करणारे आहे.

 “मार्केटिंग आणि जाहिरात जगताच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रेक्षक इतक्या मोठ्या थेट क्रिकेटच्या मॅचमध्येच लाँचचे साक्षीदार होणार आहेत. हा ट्रेलर 29 मे रोजी होणाऱ्या अंतिम सामन्याच्या सेकंड हाफच्या वेळी स्टार स्पोर्ट्सवर टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपित केला जाईल, जो जाहिरात आणि मार्केटिंगमध्ये क्रांती घडवून आणेल आणि नवीन बेंचमार्क स्थापित करेल. जागतिक टेलिव्हिजन प्लॅटफॉर्मवर आणि क्रीडा जगतात पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लॉन्च होणार आहे."

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी