Laal Singh Chaddha: लाल सिंह चड्ढा सिनेमाचं शूटिंग रद्द, करिना-आमिर मुंबईत परत 

बी टाऊन
Updated Mar 16, 2020 | 22:56 IST

कोरोना व्हायरसमुळे आमीर खान आणि करिना कपूर खान सिनेमाचा लाल सिंह चड्ढाचं शूटिंग रद्द झालं आहे आणि आमिर लवकरच मुंबईला येणार आहे. 

Laal Singh Chaddha shoot postponed
कोरोनाचा फटका, आमिर खानच्या या सिनेमाचं शूटिंग रद्द  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबईः कोरोना व्हायरसचा फटका सर्वच व्यवसाय आणि उद्योगधंद्यांना बसला आहे. आता याच कोरोनाचा फटका मनोरंजन क्षेत्राला देखील बसणार आहे. कारण १९ मार्चपासून ते 31 मार्चपर्यंत सिनेमा, टीव्ही मालिका आणि वेब सीरीज यांचं शूटिंग बंद राहणार आहे. याचा फटका बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा सिनेमा लाल सिंह चड्ढावरही झाला आहे. 

याआधी बातमी समोर आली होती की, कोरोना व्हायरस असला तरी आमिर खाननं लाल सिंह चड्ढा सिनेमाची शूटिंग जारी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता असं म्हटलं जात आहे की, सिनेमाचा मोठा भाग रीयल लोकेशनवर शूट केलं जाणार होतं. यासाठी सिनेमाचं पुढचं शेड्युल पुढे ढकलण्यात आलं. परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल. 

एका पोर्टलनुसार, 12 दिवसांसाठी सर्व शूटिंग थांबवण्याचा आदेश आल्यानंतर काही तासानंतर लाल सिंह चड्ढा सिनेमाचं शूटिंग होल्डवर टाकण्यात आलं आहे. आमिर आधीपासूनच शूटिंग रद्द करण्यावर चर्चा करत होता. त्यासाठी करिना पुन्हा मुंबईला आली होती. आता आमिर सुद्धा आज पंजाबहून मुंबई परतला आहे. 

शूटिंगवर बंदी घालण्यापूर्वी या महिन्यातील बड्या सिनेमांचे रिलीज देखील पुढे ढकलण्यात आलं होतं. अक्षय कुमारचा सूर्यवंशी आणि अर्जुन कपूरचा संदीप और पिंकी फरार या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता याची कोणतीही डेट समोर आली नाही आहे. मात्र याचा परिणाम पुढच्या महिन्यात रिलीज होणाऱ्या सिनेमावर पडणार आहे. याव्यतिरिक्त गेल्या आठवड्यात रिलीज झालेला इरफान खान आणि करिना कपूर खानचा अंग्रेजी मीडियम सिनेमा देखील पुन्हा रिलीज केला जाईल. कारण आतापर्यंत काही राज्यांमध्ये सिनेमा हॉल बंद करण्यात आलेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

The Heat is On #lalsinghchaddha #nightshoots ‍♀️ @nainas89

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

राज्यातील सिनेमागृह आणि नाट्यगृह हे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश याआधीच सरकारने दिले आहेत. त्यानंतर आता मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं शूटिंग देखील बंद राहणार आहे. भारत सरकारने वैद्यकीय आणीबाणी जारी केल्यानंतर इम्पाने हा निर्णय घेतला आहे. 


इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर असोसिएशन (इम्पा), फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज आणि इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन’च्या बैठकीत हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. याविषयी एक पत्रक जारी करुन माहिती देण्यात आली आहे. या पत्रकात असं म्हटलं आहे की, केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देत आहोत. दरम्यान, मालिका आणि चित्रपटांचं शूटिंग थांबविण्यात आल्याने आता काही दिवस मनोरंजन क्षेत्रात देखील सगळीकडे शुकशुकाट असणार आहे. दरम्यान, ३० मार्चपर्यंत शूटिंग थांबविण्यात आलं आहे. मात्र, त्यापुढे शूटिंग सुरु होणार की नाही याबाबतचा निर्णय पुढील परिस्थिती पाहून घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...