Laas Singh Chaddha : 'लाल सिंग चड्ढा'22 वर्षातील आमीर खानचा सर्वात मोठा फ्लॉप, सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर अतुल कुलकर्णीचं 'ते' ट्विटही चर्चेत

बी टाऊन
Updated Sep 01, 2022 | 14:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

Laas Singh Chaddha : आमिर खानचा (Aamir Khan)'लाल सिंग चड्ढा'(Laal Singh Chaddha)हा सिनेमा 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. मोठ्या बजेटमध्ये बनलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर (Box office collection)फ्लॉप ठरला. याआधी 22 वर्षांपूर्वीच त्याचा एक सिनेमा असाच फ्लॉप ठरला होता. तर दुसरीकडे सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर अतुल कुलकर्णींचं ट्विटही चर्चेचा विषय ठरत आहे.

Aamir movie flop after 22 years
22 वर्षांनी आमीरचा सिनेमा फ्लॉप, अतुल कुलकर्णीचं ट्विट चर्चेत  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.
  • यापूर्वी 2000 साली रिलीज झालेला त्याचा 'मेला' हा सिनेमाही असाच फ्लॉप झाला होता.
  • सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर अतुल कुलकर्णीचे ट्विट खूप चर्चेत आले आहे.

Laas Singh Chaddha : आमिर खानचा (Aamir Khan) 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chaddha) हा सिनेमा  11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. 
मोठ्या बजेटमध्ये बनलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर (Box office collection) फ्लॉप ठरला. याआधी 22 वर्षांपूर्वीच त्याचा एक सिनेमा असाच फ्लॉप ठरला होता. तर दुसरीकडे सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर अतुल कुलकर्णींचं (Atul Kulkarni twitt) ट्विटही चर्चेचा विषय ठरत आहे. (Aamir movie flop after 22 years and Atul kulkarni reacts on Laal Singh Chaddha Collection)


बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि करीना कपूर खान यांचा लाल सिंग चड्ढा हा सिनेमा गेल्या महिन्यात रिलीज झाला. कलाकार आणि निर्मात्यांना या सिनेमाकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा आपली जादू दाखवू शकला नाही. 180 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा सिनेमा थिएटरमध्ये काहीच कमाल दाखवू शकला नाही. आमीर खानचा हा सिनेमा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा फ्लॉप सिनेमा आहे. याआधी 2000 मध्ये रिलीज झालेला त्याचा मेला हा सिनेमा मोठा फ्लॉप ठरला होता, या
अभिनेत्री ट्विंकलसोबत त्याने सिल्व्हर स्क्रीन शेअर केली होती. 

अधिक वाचा : या घोषणा देऊन लाडक्या बाप्पाला द्या निरोप

आमीर खानचा 'मेला' हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर सपशेल फेल झाला होता. या सिनेमात आमीर आणि ट्विंकल खन्नासोबत त्याचा भाऊ फैजल खानही होता. वृत्तानुसार, हा चित्रपट 18 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. मात्र, त्यावेळीही प्रेक्षकांनी सिनेमाकडे पाठ फिरवली होती. या सिनेमाने 15.19 कोटींची कमाई केली होती. आता 22 वर्षांनंतर आमिरचा लाल सिंग चड्ढा हा सिनेमाही फ्लॉप झाला. 180 कोटींच बजेट असलेल्या या सिनेमाने देशात 75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 

अतुल कुलकर्णींचं 'ते' ट्विट चर्चेत

तर दुसरीकडे, अतुल कुलकर्णी यांचं ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मराठीतील दिग्गज अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी लाल सिंग चड्ढा सिनेमाची कथा आणि पटकथा लिहिलेली आहे. अतुल कुलकर्णी यांनी नुकतंच ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना अतुल कुलकर्णी म्हणाले, "जेव्हा एखाद्या गोष्टीचा, घटनेचा विनाश एखाद्या मोठ्या कामगिरीप्रमाणे साजरा केला जातो, तेव्हा सत्याची किंमत कमी होते, त्याची किंमत कवडीमोल होते." अतुल कुलकर्णी यांच्या या ट्वीटवर अनेक जण प्रतिक्रिया देत आहेत. लाल सिंग चड्ढा सिनेमा फ्लॉप झाल्याने अतुल कुलकर्णी यांनी ट्विट केल्याचंही काहींनी म्हटलं आहे. 

अधिक वाचा : गर्भाशयाच्या कर्करोगावर पहिली स्वदेशी लस तयार; आज होणार लाँच

नुसतंच बॉक्स ऑफिसवर नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्मवरही निर्मात्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सिनेमाच्या निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मसह 150 कोटींची डिल केल्याचा दावा केला जात होता. मात्र, आता हा करारही रद्द झाल्याचं म्हटलं जात आहे. सिनेमा फ्लॉप झाल्यानेच करार रद्द झाला असल्याचं म्हटलं जात आहे. आता या सिनेमाचे डिजीटल राईट्स 50 कोटींना विकले गेल्याचे म्हटले जात आहे. 

अधिक वाचा :  डोळे मोठे करणाऱ्या विराट सूर्यासमोर नतमस्तक

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी