Bollywood Actress look change : 'आशिकी'च्या अभिनेत्रीला ओळखणं कठीण, लेटेस्ट फोटो पाहून चाहते थक्क

बी टाऊन
Updated Aug 07, 2022 | 16:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bollywood Actress look change : अनु अग्रवालने ( Anu Aggarwal ) तिचा एक नवीन फोटो शेअर केला आहे, जो पाहिल्यानंतर 90 च्या दशकातील या ग्लॅमरस अभिनेत्रीला ओळखू शकत नाही. आशिकीमुळे (Aashiqui movie ) रातोरात स्टार झालेली ही अभिनेत्री अचानक ग्लॅमरच्या दुनियेतून गायब झाली.

Anu Aggarwal's complete look changed photo Viral
'आशिकी' फेम अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटो व्हायरल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'आशिकी' फेम अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटो व्हायरल
  • लेटेस्ट फोटो पाहून अनु अग्रवालला ओळखणे कठीण
  • आशिकी सिनेमामुळे अनु अग्रवालला प्रसिद्धी मिळाली होती

Bollywood  Actress look change : बॉलिवूड अभिनेत्री अनु अग्रवाल  (Anu Aggarwal) 1990 साली 'आशिकी'  ( Aashiqui ) सिनेमात दिसली होती. या सिनेमामुळे अभिनेत्रीला रातोरात लोकप्रियता मिळाली. या सिनेमानंतर अभिनेत्री अनु अग्रवालला एकाहून एक सरस सिनेमांच्या ऑफर्स येऊ लागल्या. मात्र, काही वर्षांनी अनु अग्रवाल ग्लॅमरच्या ( Glamour World ) या दुनियेतून गायब झाली.आता अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media )होतात. या फोटोंमध्ये अनु अग्रवालचा लूक पूर्णपणे बदलला आहे. अभिनेत्री आता लाइमलाइटपासून पूर्णपणे दूर एक साधे जीवन जगते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिचा नवीन फोटो शेअर केला आहे,हा फोटो पाहिल्यावर हीच का ती अनु अग्रवाल असा प्रश्न पडतो. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by anu aggarwal (@anusualanu)

अधिक वाचा : स्विमिंग करून करा वजन कमी, तासात होत्यात एवढ्या कॅलरी बर्न

अनु अग्रवालने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. फोटो पाहता, अभिनेत्री ऑटोरिक्षात बसल्यासारखं वाटते. या फोटोत अनु अग्रवाल खूपच ग्लॅमरस दिसत आहे. डोळ्याला मोठा गॉगल, गळ्यात स्टायलिश नेकलेस आणि कानात लांब झुमके असा अभिनेत्रीचा स्टायलिश लूक दिसत आहे. हा फोटो शेअर करत अनु अग्रवालने लिहिले, "मुव्ह इट ड्यूड ???? तुम्हाला आवडलेल्या रंगात????" असे कॅप्शन दिले आहे. अनु अग्रवालचा हा फोटो पाहून काही लोक आश्चर्यचकित झाले आहेत आणि तिला ओळखू शकत नाहीत, तर काही लोक फोटोवर 'गॉर्जियस मॅम', 'लव्हली फोटो', 'ग्लॅमर क्वीन' अशा कमेंट करत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by anu aggarwal (@anusualanu)

अधिक वाचा : आयफोन 13 च्या किंमती उतरल्या

अनु अग्रवालचा जन्म दिल्लीत झाला आणि तिने वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या 'आशिकी'  ( Aashiqui ) सिनेमाच्या लोकप्रियतेनंतर अनुने तमाशा, खलनायिका, किंग अंकल, कन्यादान आणि रिटर्न टू ज्वेल थीफ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केले. अनु अग्रवालचा भीषण कार अपघात झाल्याचंही म्हटलं जातं. ज्यामुळे ती जवळपास एक महिना कोमात होती असंही म्हटलं जाते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी