VIDEO: समुद्र किनाऱ्यावर अभिनेत्रीचा लिपलॉक

बी टाऊन
Updated Jan 07, 2020 | 18:10 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

टीव्ही अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत ती पतीसोबत खूपच रोमॅन्टिक मुडमध्ये दिसत आहे.

aashka goradia actress liplock hubby brent goble share video instagram entertainment news marathi google
VIDEO: समुद्र किनाऱ्यावर अभिनेत्रीचा लिपलॉक   |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • समुद्र किनाऱ्यावर अभिनेत्रीचा लिपलॉक
  • पतीसोबत लिपलॉक केल्याचा व्हिडिओ अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर केला शेअर
  • टीव्ही अभिनेत्री आशका गोराडिया आणि ब्रेंट यांचा लिपलॉक व्हिडिओ

कुसुम, क्युंकी सास भी कभी बहू थी, कहीं तो होगा, सात फेरे आणि डायन या सारख्या अनेक टीव्ही सीरिअलमध्ये भूमिका केलेली अभिनेत्री आशका गोराडिया सध्या हॉलिडे एन्जॉय करत आहे. अभिनेत्री आशकाने नुकतेच आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत अभिनेत्री आशका आपला पती ब्रेंट गोबले याच्यासोबत खूपच रोमॅन्टिक मुडमध्ये असल्याचं दिसत आहे.

 

 

 

 

अभिनेत्री आशका गोराडिया आणि ब्रेंट गोबले हे एका बीचवर रोमान्स करताना दिसत आहेत. बीचवर ब्रेंट आशकाला उचलतो आणि एक स्टंट करतो. यानंतर दोघे लिपलॉक करतानाही व्हिडिओत दिसत आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओच्या बॅकग्राऊंटला एक रोमॅन्टिक गाणं प्ले होत आहे. या व्हिडिओत कपलची केमेस्ट्री खूपच चांगली दिसत आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Hello 2020 @ibrentgoble my travel buddy for life!! Many more to come..

A post shared by Aashka Goradia Goble (@aashkagoradia) on

 

टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉसची एक्स कंटेस्टंट आशका गोराडिया सोसल मीडियात खूपच फेमस आहे. आशकाने सोशल मीडियात अनेक बिकिनी फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत असते. आशका आपल्या पतीसोबतही अनेक फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. यापैकी अनेक व्हिडिओत आशका आणि ब्रेंट योगासन करतानाही दसतात. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Merry Christmas from ours to yours. . . Best time fo the year... Love and light Jingles and Joy @ibrentgoble

A post shared by Aashka Goradia Goble (@aashkagoradia) on

 

२७ नोव्हेंबर १९८५ मध्ये गुजरातमधील अहमदाबाद येथे आशका गोराडियाचा जन्म झाला आहे. २०१७ साली आशका हिने आपला बॉयफ्रेंड ब्रेंट याच्यासोबत लग्न केलं. दोघांनी हे लग्न हिंदू आणि ख्रिश्चन परंपरेनुसार लग्न केलं. आशका बिग बॉस सीजन ६ची स्पर्धक होती. बिग बॉस दरम्यान आशका खूपच चर्चेत होती.

आशका गोराडिया ही टीव्ही इंडस्ट्रीमधील एक मोठं नाव आहे. आशकाने आतापर्यंत अनेक टीव्ही सीरिअल्समध्ये काम केलं आहे. आशकाने नागिन २ सीरिअलमधून आपली एक वेगळी ओळख बनवली. आशका गोराडिया एक योगा प्रेमी असून आफल्या पतीसोबत ती नेहचमीच योगाचे फोटो, व्हिडिओज सोशल मीडियात शेअर करत असते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी