OTT web series in 2022: नव्या वर्षात ओटीटीवर प्रेक्षकांचं होणार भरपूर मनोरंजन; आश्रम 3 ते पंचायत सीझन 2 होणार रिलीज

बी टाऊन
Updated Dec 30, 2021 | 16:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

OTT web series in 2022: कोरोनाच्या काळात जेव्हा सिनेमा हॉल बंद होते, तेव्हा OTT प्लॅटफॉर्मने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. गेल्या दोन वर्षांत एकामागून एक उत्तम वेबसिरीज आल्या आणि आता प्रेक्षक त्यांच्या नव्या सीझनची वाट पाहत आहेत. 2022 मध्ये वेबसिरीजचे कोणते नवीन सीझन येणार आहेत ते पाहुया.

Aashram 3 to panchayat 2 these web series will release in 2022
2022 मध्ये 'या' वेबसीरिजचे नवे सीझन येणार ओटीटीवर   |  फोटो सौजन्य: YouTube
थोडं पण कामाचं
  • नवीन वर्षात अनेक वेबसिरीजचे नवे सीझन येणार आहेत.
  • गेल्या दोन वर्षांत एकाहून एक उत्तम वेबसिरीज आल्या.
  • ओटीटी प्लॅटफॉर्म दीर्घकाळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.

OTT web series in 2022:  कोरोनाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत आणि अनेक राज्यांनी निर्बंधही लादले आहेत. दिल्ली सरकारने थिएटर बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. या आदेशानंतर पुन्हा एकदा चित्रपटांवर कोरोनाची छाया दिसू लागली आहे. कोरोनाच्या काळात जेव्हा सिनेमा हॉल बंद होते, तेव्हा OTT प्लॅटफॉर्मने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. गेल्या दोन वर्षांत एकामागून एक उत्तम वेबसिरीज आल्या आणि आता प्रेक्षक त्यांच्या नव्या सीझनची वाट पाहत आहेत.
 

या वेबसीरिजचे नवे सीझन येणार

आश्रम 3 

प्रकाश झा दिग्दर्शित एमएक्स प्लेयरच्या आश्रम या वेबसीरिजचे दोन सीझन आले आहेत आणि आता चाहते तिसर्‍या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. पहिल्या दोन सीझनमध्ये प्रेक्षकांनी बाबाचे (Bobby Deol) काळे कारनामे पाहिले आणि आता पुढच्या सीझनमध्ये बाबावर कारवाईची प्रतीक्षा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या वेबसीरिजचे शूटिंग भोपाळमध्ये सुरू आहे आणि त्याचा नवा सीझन मे-जूनमध्ये पाहायला मिळणार आहे.


पंचायत 2


Amazon Prime ची मालिका पंचायत ही आतापर्यंतची सर्वात लोकप्रिय मालिका आहे. जितेंद्र कुमार यांनी या मालिकेत पंचायत सचिवाची भूमिका अतिशय सुंदर पद्धतीने साकारली आहे, तर नीना गुप्ता गावच्या प्रमुखाच्या भूमिकेत आणि रघुवीर यादव पतीच्या भूमिकेत आहे. या मालिकेत प्राइम लेव्हलवर केलेले राजकारण दाखवण्यात आले होते. 
सध्या मालिकेच्या नवीन सीझनचे शूटिंग सुरू असून ती 2022 मध्ये रिलीज होणार आहे.


असुर 2

Asur - Official Trailer | Entertainment - Times of India Videos

वूट सिलेक्टची असुर या वेबसिरीजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या क्राईम-थ्रिलरमध्ये अर्शद वारसी आणि बरुण सोबती मुख्य भूमिकेत होते. पहिल्या सीझननंतर त्याच्या नव्या सीझनला मागणी होती. त्याचा दुसरा सीझन येणार असून अर्शद वारसीने त्याचे शूटिंग सुरू केल्याचे वृत्त आहे. असुर 2 पुढील वर्षी रिलीज होणार आहे.

दिल्ली क्राइम 2

राजधानी दिल्लीतील बलात्कार प्रकरणावर बनलेली 'दिल्ली क्राइम 2' ही वेबसीरिज चांगलीच पसंतीस उतरली होती. या मालिकेचा पहिला भाग 2019 मध्ये आला होता आणि तेव्हापासून त्याच्या पुढच्या सीझनची चर्चा होत आहे. दिल्ली क्राइमचे प्रेक्षकया मालिकेच्या पुढील सीक्वलची वाट पाहत आहेत आणि बातमी अशी आहे की 2022 मध्ये त्याचा नवीन सीझन येणार आहे.

फॅमिली मॅन 3

The Family Man 2': Samatha Ruth Prabhu and Manoj Bajpayee spill the beans  on playing Raji and Srikant Tiwari - Times of India

द फॅमिली मॅन'च्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि आता चाहत्यांना तिसर्‍या सीझनची प्रतीक्षा आहे. तिसऱ्या सीझनची कथा समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार सीझन 3 कोरोना कालावधीवर आधारित असेल. यावेळी श्रीकांत आणि त्याची टीम चिनी सैनिक आणि एजंटशी भिडणार आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, सीझन 3 ची कथा एका नवीन मिशनवर आधारित असेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी