IIFA Awards 2022: परफॉर्मन्स सुरु असताना अभिषेक बच्चन स्टेजवरून खाली उतरा, ऐश्वर्या रायसोबत केला जबरदस्त डान्स

बी टाऊन
Updated Jun 05, 2022 | 16:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

Abhishek Bachchan Video IIFA Awards 2022: अभिषेक बच्चनच्या आयफा अवॉर्ड्स 2022 मधील डान्स परफॉर्मन्सचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये अभिषेक बच्चन स्टेजवरून खाली उतरून जबरदस्त डान्स करत आहे.

Abhishek Bachchan came off from the stage while doing performance
अभिषेक बच्चनचा ऐश्वर्यासोबत धमाकेदार डान्स  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 3 आणि 4 जून रोजी अबू धाबी येथे IIFA पुरस्कार 2022 चे आयोजन करण्यात आले होते.
  • पुरस्कार सोहळ्यातील अभिषेक बच्चनचा डान्स परफॉर्मन्सचा व्हिडिओ समोर आला आहे.
  • डान्स करताना अभिषेक बच्चन स्टेजवरून खाली आला.

Abhishek Bachchan performance in IIFA: आयफा अवॉर्ड्स 2022 मध्ये अनेक स्टार्सनी खास परफॉर्मन्स दिला. या पुरस्कार सोहळ्यातील अभिषेक बच्चनच्या परफॉर्मन्सचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये अभिषेक बच्चन पत्नी ऐश्वर्या रायसोबत डान्स करत आहे. यावेळी त्यांची मुलगी आराध्या बच्चनही उपस्थित होती. 
बच्चन कुटुंबाची ही केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते.

अभिषेक बच्चन आयफामध्ये स्पेशल परफॉर्मन्स देत होता.अचानक तो स्टेजवरून खाली आला. पत्नी ऐश्वर्या राय आणि मुलगी आराध्या बच्चनसोबत तो जबरदस्त नाचू लागला. 
वडिलांना पाहून आराध्या बच्चनही डान्स करू लागली. या अवॉर्ड सोहळ्याच्या ग्रीन कार्पेटवरून यापूर्वी अभिषेक,ऐश्वर्या आणि आराध्याचा लूक समोर आला होता.
ऐश्वर्या राय बच्चनने ब्लॅक कलरचा प्लेन गाऊन परिधान केला आहे. त्यावर फ्रंट ओपन लाँग जॅकेट कॅरी केले आहे. या जॅकेटवर गोल्डन आणि मल्टी कलरची फ्लोरल एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे. अभिनेत्रीने मिडल पार्टेड ओपन हेअर स्टाइल केली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by IIFA Awards (@iifa)


अभिषेक बच्चनच्या सिनेमाला मिळाले अवॉर्ड

अभिषेक बच्चनच्या लुडो चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मूळ कथेचा पुरस्कार मिळाला. याशिवाय पंकज त्रिपाठी यांना लुडो चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा (पुरुष) पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर शेरशाह या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासह चार पुरस्कार मिळाले. सरदार उधम सिंगसाठी विकी कौशलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्याच वेळी, क्रिती सेनॉनने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब पटकावला. अबुधाबीच्या यास बेटावर आयफा अवॉर्ड्सचे आयोजन केले जात आहे.


अभिषेक बच्चन बॉब बिस्वास आणि दस्त या चित्रपटात दिसला होता. याशिवाय तो SSS-7 या चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर ऐश्वर्या राय पोन्निनी सेल्वममध्ये दिसणार आहे. हा चित्रपट पीरियड फिल्म आहे. मणिरत्नम या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी