Annu Kapoor : छातीत दुखू लागल्यामुळे अभिनेता अन्नू कपूर दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल

Actor Annu Kapoor admitted to hospital in Delhi due to chest pain, Annu Kapoor Health Live Update : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अन्नू कपूर छातीत दुखू लागल्यामुळे दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे.

Actor Annu Kapoor admitted to hospital in Delhi due to chest pain
छातीत दुखू लागल्यामुळे अभिनेता अन्नू कपूर दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • छातीत दुखू लागल्यामुळे अभिनेता अन्नू कपूर दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल
  • दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल
  • वेळेत उपचार सुरू झाल्यामुळे आता अन्नू कपूरची प्रकृती स्थिर

Actor Annu Kapoor admitted to hospital in Delhi due to chest pain, Annu Kapoor Health Live Update : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अन्नू कपूर छातीत दुखू लागल्यामुळे दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे. वेळेत उपचार सुरू झाल्यामुळे आता अन्नू कपूरची प्रकृती स्थिर आहे.

अन्नू कपूर याला प्रजासत्ताक दिनी (गुरुवार 26 जानेवारी 2023) सकाळीच छातीत वेदना होऊ लागल्या. त्रास वाढत असल्याची जाणीव होताच अन्नू कपूर हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. 

कोण आहे अन्नू कपूर?

अन्नू कपूर बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याचा जन्म 20 फेब्रुवारी 1956 रोजी भोपाळमधील इटवारा येथे झाला. आई कमल ही बंगाली तर वडील मदनलाल हे पंजाबी असल्यामुळे अन्नू कपूर बालपणापासूनच बहुभाषिक झाला. अन्नू कपूरचेचे खरे अनिल कपूर असे आहे. पण बॉलिवूडमध्ये त्याला अन्नू कपूर या नावानेच ओळखले जाते. त्याच्या वडिलांची एक पारशी नाटक कंपनी होती तर आई कवी आणि शास्त्रीय गायिका होती. अन्नू कपूरचे आजोबा डॉ. कृपा राम कपूर ब्रिटिश सैन्यात डॉक्टर होते तर पणजोबा पणजोबा लाला गंगाराम कपूर स्वातंत्र्यसैनिक होते.

घरची आर्थिक परिस्थिती बिकट होती त्यामुळे अन्नू कपूर यांनी माध्यमिक शिक्षणानंतर शाळा सोडली होती. आई 40 रुपये मासिक पगाराची नोकरी करत होती आणि वडिलांची नाटक कंपनी सुरू असली तरी खर्च वजा झाल्यावर हाती मोठे उत्पन्न येत नव्हते. अखेर वडिलांनी अन्नू कपूरला नाटक कंपनीत कलाकार म्हणून सहभागी करून घेतले. मोठे बंधू रणजीत यांच्या आग्रहाचा मान राखत अन्नू कपूर यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयात प्रवेश घेतला. पुढे 1981 मध्ये राष्ट्रीय नाट्य विद्यालयतील पदवी घेऊन बाहेर पडलेल्या अन्नू कपूर यांनी मुंबईत एक रुका हुआ फैसला या नाटकात ७० वर्षांच्या व्यक्तीची भूमिका साकारली. ही भूमिका बघून प्रसिद्ध सिनेमा दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी अन्नू कपूर यांना 1983 मध्ये मंडी सिनेमात कलाकार म्हणून सहभागी करून घेतले. नंतर बासू चटर्जी यांनी 1986 मध्ये एक रुका हुआ फैसला सिनेमाचे दिग्दर्शन केले. अन्नू कपूर या सिनेमात होते. याआधी 1984 मध्ये उत्सव सिनेमात अन्नू कपूर यांनी विनोदी भूमिका केली होती.  उत्सव या सिनेमातील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअरचे विनोदी कलाकार श्रेणीचे नामांकन मिळाले होते. यानंतर अन्नू कपूर यांनी 1993 मध्ये सरदार सिनेमात मोहनदास करमचंद गांधी ही भूमिका साकारली होती. दूरदर्शनसाठी संत कबीर यांच्यावरील टीव्ही मालिकेत अन्नू कपूरने संत कबीर ही भूमिका साकारली होती. तसेच अन्नू कपूर यांनी 1996 मध्ये कालापानी या मल्याळम सिनेमात विनायक दामोदर सावरकर ही भूमिका साकारली होती. 

तेजाब सिनेमात अनिल कपूर नावाचे 2 कलाकार सहभागी झाले. अखेर प्रेक्षकांचा गोंधळ टाळण्यासाठी सोनम कपूरचे वडील अनिल कपूर यांनी त्यांचे नाव कायम ठेवले तर दुसरे अनिल कपूर अर्थात अन्नू कपूर यांनी त्यांचे अनिल कपूर हे नाव बदलून अन्नू कपूर केले. पुढे अन्नू कपूर हे नाव लोकप्रिय झाले.

सिनेमा आणि टीव्ही इंडस्ट्रीत अन्नू कपूरने काम केले आहे. तो 1993 ते 2006 या काळात झी टीव्ही चॅनलच्या अंताक्षरी कार्यक्रमाचा मुख्य अँकर होता. 

मिस्टर इंडिया (1987), विकी डोनर (2012), जॉली एलएलबी (2017) हे अन्नू कपूरचे अतिशय लोकप्रिय सिनेमे आहेत. विकी डोनर या सिनेमासाठी त्याला फिल्मफेअर अॅवॉर्ड आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

नाना पाटेकर, मून मून सेन आणि बेंजामिन गिलानी यांनी अभिनय केलेल्या अभय या सिनेमाचे दिग्दर्शन अन्नू कपूर यांनी केले. या सिनेमाला 1994 मध्ये सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. सध्या अन्नू कपूर 92.7 बिग एफएमवर 'सुहाना सफर विथ अन्नू कपूर' हा शो करत आहेत. 

अन्नू कपूरला हम, एक रुका हुआ फैसला, राम लखन, घायल, हम किसी से कम नहीं, ऐतराज, 7 खून माफ, जॉली एलएलबी आणि जॉली एलएलबी 2, या सिनेमांतील भूमिकांसाठीही ओळखले जाते. काही महिन्यांपूर्वीच अन्नू कपूर क्रॅश कोर्स या अॅमेझॉन प्राईमच्या वेबसीरिजमध्ये दिसला होता. 

Pathaan vs MNS : शाहरूख खानच्या पठाणला मनसेचा विरोध

Pathaan full movie Download in HD leaked online : शाहरूख दीपिकाचा पठाण झाला लीक, डाऊनलोड करण्यासाठी ऑनलाईन उपलब्ध

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी