ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हॉस्पिटलमधून घरी परतले

Actor Dharmendra Is Back Home from Hospital : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना पाठदुखीचा त्रास वाढल्यामुळे मुंबईच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचारांनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली.

Actor Dharmendra Is Back Home from Hospital
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हॉस्पिटलमधून घरी परतले  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हॉस्पिटलमधून घरी परतले
  • पाठदुखीचा त्रास वाढल्यामुळे मुंबईच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल होता धर्मेंद्र
  • उपचारांनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसल्यामुळे डॉक्टरांनी घरी जाण्याची परवानगी दिली

Actor Dharmendra Is Back Home from Hospital : मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना पाठदुखीचा त्रास वाढल्यामुळे मुंबईच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचारांनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली.

धर्मेंद्र करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या हिंदी सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या सिनेमात आलिया भट्ट कपूर, रणवीर सिंह, जया बच्चन, शबाना आझमी हे कलाकार पण दिसणार आहेत. लवकरच 'अपने २' हा सिनेमा येत आहे. या सिनेमात धर्मेंद्र, सनी देओल आणि बॉबी दिओल दिसणार आहेत. 'अपने २' या सिनेमात सनी देओलचा मुलगा करण देओल पण दिसणार आहे.

याआधी २००७ मध्ये अपने हा हिंदी सिनेमा प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांची पसंती मिळविणाऱ्या या सिनेमाचा सिक्वल 'अपने २' लवकरच प्रदर्शित होणार आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी