सुशांत सिंह राजपूतच्या घरी पोहचले अभिनेते नाना पाटेकर, कुटुंबाला असा दिला दिलासा

Nana Patekar visits Sushant Singh Rajput Patna House: दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनीही रविवारी सुशांतच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबाची भेट घेऊन आपले दुःख व्यक्त केले.

actor nana patekar meets late actor sushant singh rajput family in patna
सुशांत सिंह राजपूतच्या घरी पोहचले अभिनेते नाना पाटेकर 

थोडं पण कामाचं

  • नाना पाटेकरांनी सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबाची भेट घेतली
  • पाटणा येथील निवासस्थानी झाली भेट 
  • सुशांतने १४ जून रोजी मुंबईत केली होती आत्महत्या 

पाटणा : बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant singh Rajput) याने १४ जून रोजी मुंबईत आपल्या राहत्या अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली होती. त्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला. सुशांतच्या मृत्यूनंतर अनेक नेते आणि अभिनेत्यांनी पाटणा (Patna) येथील त्याच्या घरी जाऊन शोक व्यक्त केला. दिग्गज अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनीही रविवारी सुशांतच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबाची भेट घेऊन आपले दुःख व्यक्त केले. त्यांनी सुशांतच्या छायाचित्राला माळ अर्पण करून त्याला श्रद्धांजली वाहिली. 

माध्यमांच्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांनी सुशांतचे वडील कृष्ण कुमार सिंह यांचे सांत्वन केले आणि त्यांना धीराने घेण्यास सांगितले. हा दिलासा देताना नाना पाटेकर म्हणाले, की सुशांत एक चांगला माणूस होता. त्याला नक्कीच न्याय मिळेल. सुशांतच्या मृत्यूने संपूर्ण देश दुःखी आहे. हे सांगायला हवे की नाना पाटेकर पाटणामधील मोकामा इथल्या सी.आर.पी.एफ. प्रशिक्षण केंद्रात जवानांचे मनोबल उंचावण्यासाठी गेले होते. यानंतर ते पाटण्यातील राजीव नगर इथे सुशांतच्या घरी पोचले आणि त्यांनी त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली.

Sushant Singh Rajput

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर भोजपुरी सिनेसृष्टीतील अनेकजण त्याच्या घरी भेटीसाठी गेले होते. यामध्ये खेसारी लाल यादव आणि अक्षरा सिंह यांचाही समावेश होता. भोजपुरी गायक आणि भाजपा खासदार मनोज तिवारी यांनीही सुशांतच्या कुटुंबियांची भेट घेऊन सहवेदना प्रकट केली होती. याशिवाय सुशांतची पूर्वाश्रमीची गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिनेही सुशांतच्या कुटुंबियांची भेट घेतली होती.


सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस सातत्याने करत आहेत. नेमक्या कोणत्या परिस्थितीमुळे सुशांतने आत्महत्या केली हे शोधून काढण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी एकूण २२ जणांच्या जबाब नोंदविण्यात आले आहेत. परंतु, शवविच्छेदन अहवालात त्याच्या मृत्यूचे कारण फाशी असेच आले आहे. तरीही पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी