Nawazuddin Siddiqui: छेडछाड प्रकरणी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला अद्याप दिलासा नाही

बी टाऊन
Updated Apr 28, 2022 | 12:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

Nawazuddin Siddiqui । बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. दरम्यान त्यांची पत्नी आलिया सिद्दीकीच्या (Alia Siddiqui) तक्रारीवरून दाखल झालेल्या विनयभंग प्रकरणात पोलिसांनी आलियाला क्लिन चिट दिली आहे. नवाजुद्दीन आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी कोर्टात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे.

Actor Nawazuddin Siddiqui is yet to be relieved in the harassment case
छेडछाड प्रकरणी नवाजुद्दीन सिद्दीकीला अद्याप दिलासा नाही  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • छेडछाड प्रकरणी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला अद्याप दिलासा नाही.
  • २७ जुलै २०२० रोजी नवाजुद्दीन सिद्दीकी यांची पत्नी आलिया सिद्दीकीने मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.
  • अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१२ च्या विनयभंग प्रकरणात नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या अटकेला स्थगिती दिली.

Nawazuddin Siddiqui । मुंबई : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. दरम्यान त्यांची पत्नी आलिया सिद्दीकीच्या (Alia Siddiqui) तक्रारीवरून दाखल झालेल्या विनयभंग प्रकरणात पोलिसांनी आलियाला क्लिन चिट दिली आहे. नवाजुद्दीन आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी कोर्टात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. मात्र पोलिसांच्या या क्लोजर रिपोर्टला पोलिसांनी विशेष पॉक्सो कोर्टात आक्षेप घेत क्लोजर रिपोर्ट परत केला आहे. एवढेच नाही तर विशेष पॉक्सो न्यायालयाने तक्रारदाराला हजर करण्याचे आदेशही पोलिसांना दिले आहेत. (Actor Nawazuddin Siddiqui is yet to be relieved in the harassment case). 

अधिक वाचा : खुशखबर! प्रत्येक आठवड्याला मिळणार ३ दिवस सुट्टी

कधीचे आहे प्रकरण 

लक्षणीय बाब म्हणजे २७ जुलै २०२० रोजी नवाजुद्दीन सिद्दीकी यांची पत्नी आलिया सिद्दीकीने मुंबईतील वर्सोवा पोलिस ठाण्यात पती नवाजुद्दीन सिद्दीकीसह दीर मिनाजुद्दीन, फयाजुद्दीन, अयाजुद्दीन आणि सासू मेहरुनिशा यांच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली होती. ऑगस्ट २०२० मध्ये हे प्रकरण मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यातून उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील बुढाणा पोलिस ठाण्यात ट्रान्सफर करण्यात आले.

काय होते प्रकरण 

नवाजुद्दीन सिद्दीकी यांची पहिली पत्नी आलिया सिद्दीकेने आरोप केला होता की २०१२ मध्ये जेव्हा ती बुढाणा येथील सासूकडे गेली असता तिचा दीर मिनाजुद्दीन याने तिच्या मुलीचा विनयभंग केला. त्यावेळी तिचा पती नवाजुद्दीन याने पोलिसांत तक्रार करण्यास नकार दिला होता.

दरम्यान, आलियाचा आरोप आहे की तिचा दीर फयाजुद्दीन आणि अयाजुद्दीन तसेच तिची सासू मेहरुनिशा यांनी तिला विरोध केल्यावर शिवीगाळ आणि मारहाण केली. आलियाने पती नवाजुद्दीन सिद्दीकीला याबाबत माहिती दिली असता, त्यांनी पोलिसात तक्रार करण्यास नकार दिला आणि आलियाला असे करण्यापासून रोखले.

नवाजुद्दीन यांच्या अटकेला उच्च न्यायालयाने दिली स्थगिती

लक्षणीय बाब म्हणजे अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१२ च्या विनयभंग प्रकरणात नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या अटकेला स्थगिती दिली. बुढाणा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि विनयभंगाच्या या प्रकरणात चित्रपट अभिनेत्याच्या कुटुंबीयांना क्लीन चिट देत विशेष पॉक्सो न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला. विशेष पॉक्सो न्यायालयाचे न्यायाधीश संजीव कुमार तिवारी यांनी या क्लोजर अहवालावर आक्षेप घेत अहवाल परत केला आहे.

१६४ कायद्याअंतर्गत आलियाचा जबाब नोंदवला 

या प्रकरणाचा तपास करत असलेले वीर नारायण सिंह यांनी १६ ऑक्टोबर २०२० रोजी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभागीय न्यायालयात ज्योती अग्रवाल यांच्यासमोर १६४ सीआरपीसी अंतर्गत आलिया सिद्दीकीचा जबाब नोंदवला होता. त्या वक्तव्यात आलिया सिद्दीकीने तिच्यावर केलेल्या आरोपांना दुजोरा दिला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी