Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेता आर. माधवनने पंतप्रधान मोदींचं या गोष्टीसाठी केलं कौतुक, म्हणाला हा New India

बी टाऊन
भरत जाधव
Updated May 21, 2022 | 12:56 IST

 दक्षिण चित्रपटातील (southern film) अभिनेते (Actors), कलाकार (Artist) आपलं मत परखडपणे मांडत असतात. मग ते सरकारच्या विरोधात असो किंवा देशाच्या संरक्षणाविषयी असो वा आपल्याच चित्रपटसृष्टीविषयी असो. आपलं परखड मत मांडण्यामध्ये अभिनेता आर. माधवन देखील मागे नसतो. सध्या सुरू असलेल्या 75 व्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये आर माधवनने पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं आहे. 

Actor R.Madhavan praised Prime Minister Modi
आर. माधवनने पंतप्रधान मोदींचं या गोष्टीसाठी केलं कौतुक  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • 75 वा कान्स चित्रपट महोत्सव 28 मे पर्यंत असणार आहे.
  • आपल्या देशात डिजीटलायझेशन होणे हे एक मोठे संकट असेल अशी शंका जगाला होती- आर.माधवन
  • शेतकऱ्यांना फोनचा वापर करण्यासाठी वेगळ्या शिक्षणाची गरज नाही.- आर.माधवन

नवी दिल्ली :  दक्षिण चित्रपटातील (southern film) अभिनेते (Actors), कलाकार (Artist) आपलं मत परखडपणे मांडत असतात. मग ते सरकारच्या विरोधात असो किंवा देशाच्या संरक्षणाविषयी असो वा आपल्याच चित्रपटसृष्टीविषयी असो. आपलं परखड मत मांडण्यामध्ये अभिनेता आर. माधवन देखील मागे नसतो. सध्या सुरू असलेल्या 75 व्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये आर माधवनने पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं आहे. 

आंतरराष्ट्रीय स्थरावर मानाचा मानल्या जाणाऱ्या कान्स चित्रपट महोत्सवाला आता सुरुवात झाली आहे. 75 वा कान्स चित्रपट महोत्सव 28 मे पर्यंत असणार आहे. यंदाच्या या चित्रपट महोत्सवात वेगवेगळे कार्यक्रम देखील राबवले जात आहे. कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी झालेल्या अभिनेता आर माधवन याने देशातील सूक्ष्म अर्थव्यवस्थेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. या महोत्सवादरम्यान बोलताना आर माधवन म्हणाला, “आपल्या देशात डिजीटलायझेशन होणे हे एक मोठे संकट असेल अशी शंका जगाला वाटत होती. आपल्या देशात शेतकऱ्यांना स्मार्टफोन कसा वापरायचा, व्यवहार कसे करायचे याची काहीही माहिती नव्हती. पण गेल्या काही वर्षात हे दृष्य पूर्णपणे बदलले आहे. भारत हा सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा वापरकर्ता बनला आहे.”

“कारण शेतकऱ्यांना फोनचा वापर करण्यासाठी वेगळ्या शिक्षणाची गरज नाही. त्यांना पैसे मिळाले आहे की नाही, यासाठी त्यांना काहीही वेगळे करावे लागले नाही. हा नवीन भारत आहे. जेव्हा पंतप्रधानांनी त्यांचा कार्यकाळ सुरू केला, तेव्हा त्यांनी मायक्रो-इकॉनॉमी आणि डिजिटल चलन आणले. यामुळे आर्थिक जगतात खळबळ उडाली होती. हे चालणार नाही, हे एक संकट ठरेल असेही त्यावेळी काहींनी म्हटले होते”, असेही आर माधवन म्हणाला.

दरम्यान आर माधवनचे हे बोल केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. माधवनचा यावर बोलत असल्याचा एक व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला आहे. यात आर माधवनने हा रोख रक्कम या पैशाचा कमी वापर करत डिजीटल अर्थव्यवस्थेच्या दिशेने सुरु असलेल्या प्रगतीबद्दलही भाष्य केले आहे. या वर्षीच्या कान्स महोत्सवामध्ये भारताला कंट्री ऑफ ऑनर म्हणून घोषित करण्यात आले आहे. यात भारतीय संघाचे नेतृत्व केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले. त्यासोबतच आर माधवन, नवाजुद्दीन सिद्दीकी, ग्रॅमी पुरस्कार विजेते रिकी केज, शेखर कपूर, प्रसून जोशी आणि इतर व्यक्तीही कान्स महोत्सवात उपस्थित होते. यावेळी अनुराग ठाकूर यांनी या चित्रपट महोत्सवातील अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी