R Madhavan : आर माधवन आपल्या कुटुंबीयांसोबत दुबईत झाला स्थायिक, मुलाच्या करीअरसाठी घेतला निर्णय

आर माधवन नुकतंच आपल्या पत्नी आणि मुलासोबत दुबईत स्थायिक झाला आहे. माधवनचा मुलगा स्विमिंग चॅम्पियन आहे. २०२६ च्या ऑलम्पिकच्या तयारीसाठी हा निर्णय घेतल्याचे माधवनने म्हटले आहे. actor r madhvan shifted to dubai

r madhav
आर माधवन  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आर माधवन नुकतंच आपल्या पत्नी आणि मुलासोबत दुबईत स्थायिक झाला आहे.
  • माधवनचा मुलगा स्विमिंग चॅम्पियन आहे.
  • २०२६ च्या ऑलम्पिकच्या तयारीसाठी हा निर्णय घेतल्याचे माधवनने म्हटले आहे. 

R Madhavan : मुंबई : रेहना है तेरे दिल में (Rehnaa Hai Terre Dil Mein), रंग दे बसंती (Rang de basanti) आणि थ्री इडियट्स (3 Idiots) मुळे आर माधवनने आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. आर माधवन (R Madhavan) नुकतंच आपल्या पत्नी आणि मुलासोबत दुबईत (Dubai) स्थायिक झाला आहे. माधवनचा मुलगा स्विमिंग चॅम्पियन (Swimming Champion) आहे. २०२४ च्या ऑलम्पिकच्या (Olympics) तयारीसाठी हा निर्णय घेतल्याचे माधवनने म्हटले आहे. (actor r madhvan shifted to dubai for son 2024 Olympic )

आर माधवनचा मुलगा वेदांत १६ वर्षाचा आहे. वेदांत स्विमिंगमध्ये नॅशन चॅम्पियन आहे. २०२६ मध्ये होणार्‍या ऑलिम्पिकसाठी तो तयारी करत आहे. सध्या मुंबईत कोविडमुळे अनेक मोठे स्विमिंग पूल्स बंद आहे. तर दुबईत मोठ मोठे स्विमिंग पूल असल्याने वेदांतला त्याचा फायदा होणार आहे. वेदांतच्या तयारीत कुठलाच खंड पडू नये म्हणून माधवन त्यांच्या कुटुंबीयांसोबत दुबईत स्थायिक झाला आहे.

दुबईत अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरचे स्विमिंग पूल्स आहेत. स्विमिंगमध्ये वेदांतने अनेक मेडल्स जिंकले आहेत. एक बाप म्हणून मी माझ्या मुलाचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करणार आहे असे माधवनने एका मुलाखातीत म्हटाले होते. ऑक्टोबर महिन्यात वेदांतने ज्युनियर नॅशल एक्वाटिक चॅम्पियनशीपमध्ये महाराष्ट्रासाठी सात पदक जिंकले होते. वेदांतने Basavaganudi Aquatic केंद्रात स्विमिंग चॅम्पियनशीपमध्ये चार रौप्य पदक, तीन कांस्य पदक पटकावले होते. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी