रघु रामच्या मित्राचा कोरोनामुळे मृत्यू, लिहिली भावूक पोस्ट

बी टाऊन
Updated May 22, 2020 | 16:52 IST | टाइम्स नाऊ हिंदी

अभिनेता रघु रामचा मित्र अब्दुल रौफचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला. ज्यामुळे रघु रामला मोठा धक्का बसला आहे. रघु रामने सोशल मीडियावरून ही माहिती दिली.

actor raghu ram
या अभिनेत्याच्या मित्राचा कोरोनामुळे मृत्यू  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • अभिनेता रघु रामचा मित्र अब्दुल रौफचा कोरोनामुळे मृत्यू
  • रघु रामने सोशल मीडियावर केली भावूक पोस्ट
  • अब्दुल रौफसोबत फोटो पोस्ट करत रघु राम म्हणाला, हे कधी ठीक होणार नाही

मुंबई: कोरोना व्हायरसने सध्या जगभरात थैमान घातले आहे. भारतातही सातत्याने कोरोनाबाधित रुग्ण वाढत चालले आहेत. देशात कोरोनाचे तब्बल १ लाख २० हजार रुग्ण आढळले आहेत. तर तब्बल साडे तीन हजार लोकांचा यात मृत्यू झाला आहे. आता अभिनेता आणि टीव्ही होस्ट रघु रामनेही सोशल मीडियावरून कोरोनामुळे आपल्या मित्राचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.

११ वर्षापूर्वी ड्रायव्हर म्हणून झाली होती ओळख

रघु रामने सोशल मीडियावर अब्दुल रौफसोबतचा आपला फोटो पोस्ट केला आहे आणि म्हटले, तुझी खूप आठवण येईल. या पोस्टमध्ये रघुने लिहिले की, कालच्या रात्री कोविड १९मुळे मी तुला गमावले. मला जे दु:ख होतय ते मी सांगू शकत नाही. २००९मध्ये तु ड्रायव्हर म्हणून माझ्या आयुष्यात आलास मात्र तु जो कोणी होतास त्याने मी हैराण झालो. तु अब्दुल रौफ होता. एक प्रेमळ, इमानदार आणि मेहनती मित्र. तुझी अनेक स्वप्ने होती आणि ती पूर्ण करण्याची हिंमतही तुझ्यात होती. तु अनेक प्रॉडक्शनमध्ये काम केले. तु एक असा माणूस होता ज्याच्यावर आम्ही सारे अवलंबून होतो. तु आपल्या मेहनतीने आपले नशीब बदललेस.

भावूक पोस्ट

रघुने अब्दुलची आठवण काढताना पुढे लिहिले, तु आपल्या मेहनतीने नशीब बदलले. आयुष्यात आणखी खूप काही मिळवायचे होते. खूप लढाया जिंकायच्या होत्या. मला तुझी किती आठवण येईल हे मी तुला सांगू शकत नाही. मला अजूनही विश्वास नाही की तु या जगात नाहीस. गुडबाय अब्दुल. ही कधीच भरून न निघणारी हानी आहे.

राजीव लक्ष्मणनेही काढली अब्दुलची आठवण

अब्दुलच्या मृत्यूने रघु रामचा भाऊ राजीव लक्ष्मणही दु:खी आहे. त्याने अब्दुलसोबतचा फोटो पोस्ट केला आणि त्याला श्रद्धांजली वाहिली. त्याने पोस्टमध्ये लिहिले, देव तुझ्या आत्म्यास शांती देवो. सोबत आपला प्रवास लांबचा राहिला. तु ड्रायव्हरपासून ते माझ्या कंपनीत प्रॉडक्शन हेड बनलायस. माझ्या सहकाऱ्यापासून ते तू माझा मित्र बनलास. हा फोटो एक वर्षाहून जुना लडाखमध्ये काढलेला आहे. लव्ह यू फॉरेव्हर भाईजान.

बोनी कपूर यांचे तीन हाऊस हेल्पर कोरोना पॉझिटिव्ह

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वेगाने वाढतोय. मुंबईत आतापर्यंत २५ हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. नुकतेच सिने निर्माता बोनी कपूर यांचे तीन हाऊस हेल्पर कोरोना पॉझिटिव्ह आढळले. दरम्यान, बोनी कपूर आणि दोन्ही मुली जान्हवी आणि खुशी कपूर यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी