बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान आणि सलीम खान यांना धमकीचे पत्र

Actor Salman Khan & his father Salim Khan received a threat letter : बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान आणि सलमानचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले. या प्रकरणी मुंबईत वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात एफआयआर नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे.

Actor Salman Khan & his father Salim Khan received a threat letter
बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान आणि सलीम खान यांना धमकीचे पत्र  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान आणि सलीम खान यांना धमकीचे पत्र
  • वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात एफआयआर नोंदवून तपास सुरू
  • बिश्नोई टोळीने सलमान किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यावर हल्ला करू नये यासाठी मुंबई पोलीस खबरदारी घेत आहेत

Actor Salman Khan & his father Salim Khan received a threat letter : मुंबई : बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान आणि सलमानचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले. या प्रकरणी मुंबईत वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात एफआयआर नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी सलमान खान आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या संरक्षणात वाढ केल्याचे सांगितले. 

लॉरेन्स बिश्नोईचा प्रवास : विद्यार्थी राजकारण ते संघटीत गुन्हेगारी

सलीम खान ज्या भागात धावण्याचा व्यायाम करण्यासाठी जातात त्या भागात सलमान खान आणि सलीम खान या दोघांच्या नावाचा उल्लेख असलेले धमकीचे पत्र टाकून ठेवले होते. हे पत्र नजरेस पडताच सलीम खान घाबरले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला. 

काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिश्नोई टोळीने पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या केली. बिश्नोईने २०१८ मध्ये सलमान खान याला धमकी दिली होती. आता सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर काही दिवसांतच सलमान खान आणि त्याच्या वडिलांच्या नावाचा उल्लेख करून धमकीचे पत्र सार्वजनिक ठिकाणी टाकण्यात आले. यामुळे पोलिसांनी धमकीच्या पत्राची गंभीर दखल घेतल्याचे वृत्त आहे. 

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येच्या प्रकरणात पंजाब पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंतच्या तपासातून हत्येचा कट दिल्लीच्या तिहार जेलमध्ये तयार झाल्याची माहिती उघड झाली आहे. लॉरेन्स बिश्नोई तिहार जेलमध्ये आहेत. तिथून बिश्नोईने एका व्हर्च्युअल नंबरवरून कॅनडामध्ये गोल्डीशी संपर्क साधला. यानंतर गोल्डीने पुढील कटाची आखणी आणि अंमलबजावणी करण्यासाठी आदेश दिले. जेलमध्ये असलेल्या बिश्नोईने कॅनडात संपर्क कसा साधला याचा तपास सुरू आहे. बिश्नोई टोळीने सलमान किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यावर हल्ला करू नये यासाठी मुंबई पोलीस खबरदारी घेत आहेत.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी