लॉकडाऊनमुळे महाभारतातील इंद्र देवावर पाहा काय आली परिस्थिती

बी टाऊन
Updated May 22, 2020 | 14:22 IST | टाइम्स नाऊ हिंदी

टीव्ही सीरियल महाभारतात देवराज इंद्राची भूमिका साकारणारे अभिनेता सतीश कौल सध्या आर्थिक समस्येने त्रस्त आहेत. सतीशने आता मदतीसाठी फिल्म इंडस्ट्रीकडे हाक मारली आहे.

satish kaul
महाभारतातील इंद्र देवाची लॉकडाऊनमुळे झाली ही स्थिती 

थोडं पण कामाचं

  • महाभारतात देवराज इंद्राची भूमिका साकारणारे अभिनेते सतीश कौल यांना पैशाची चणचण जाणवत आहे
  • सतीश कौल यांनी मदतीसाठी हाक मारली आहे
  • गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी आहेत

मुंबई: महाभारतात देवराज इंद्राची भूमिका साकारणारे अभिनेते सतीश कौल सध्या आर्थिक समस्येने त्रस्त आहेत. त्याच्या कण्याचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. याच कारणामुळे त्यांना चंदीगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तब्बल ३०० हिंदी आणि पंजाबी सिनेमात काम करणाऱ्या या अभिनेत्याने आता मदतीसाठी हाक दिली आहे.

सतीश कौल यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले, मी औषध, खाणे-पिणे तसेच अत्यावश्यक गरजेच्या वस्तूंसाठी संघर्ष करत आहे. मी इंडस्ट्रीमधील लोकांना विनंती करतो की त्यांनी मला मदत करावी. एक अभिनेता म्हणून मला खूप प्रेम मिळाले मात्र आता एक माणूस म्हणून माझ्यावर लक्ष देणे गरजेचे आहे.

पीटीआयच्या रिपोर्टनुसार २०११मध्ये सतीश कौल मुंबईतून पंजाबला गेले होते. त्यांनी पंजाबच्या लुधियानामध्ये अभिनय प्रशिक्षण केंद्र सुरू केले होते. सतीश कौल म्हणाले, २०१५मध्ये माझ्या कण्याचे हाड फ्रॅक्चर झाले. यानंतर मला वृद्धाश्रमात ठेवण्यात आले. मी दोन वर्षे तेथे राहिलो होतो.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

With veteran #Indian #actor #satishkaul @ #YusufBhatt (punjabi editor) #pritisapru #punjabicinema

A post shared by Priti Sapru (@pritisapru) on

अमेरिकेत आहेत पत्नी आणि मुलगा

सतीश कौल यांची पत्नी आणि मुलगा आर्थिक तंगीमुळे अमेरिकेला निघून गेले आहेत. सतीश कौल यांनी एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, त्यांनी २५ वर्षांपूर्वी आपल्या आई-वडिलांच्या कॅन्सरच्या उपचारासाठी वर्सोवा येथील फ्लॅट विकून टाकला. सतीशने आपल्या छोट्या बहिणीचे लग्न करून दिले होते. त्यानंतर अभिनय प्रशिक्षण शाळेमुळे त्यांना २० लाखांचे नुकसान झाले. सतीश म्हणाले, सरकारकडून मला ५ लाख रूपयांची मदतही मिळाली होती. दरम्यान, लॉकडाऊनमुळे त्यांची हालत खूपच बिघडली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

salute to #Captain #amarindersingh #cm of #Punjab for helping #SatishKaul aul. From #PritiSapru & #bollywood

A post shared by Priti Sapru (@pritisapru) on

या सिनेमांत केले आहे काम

सतीश कौल यांनी १९७९मध्ये आपल्या करिअरची सुरूवात केली होती. सतीशने आपल्या फिल्मी करिअरमध्ये हिंदी आणि पंजाबी मिळून एकत्रित ३०० सिनेमांत काम केले. त्यांना पंजाबी सिनमात अमिताभ बच्चन म्हणत.

सतीश कौल यांनी बॉलिवूडमधील कर्मा, प्यार तो होना ही था, आंटी नंबर वन या सिनेमांमध्ये काम केले होते. सतीश कौल यांनी महाभारत तसेच विक्रम और बेताल मध्येही काम केले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी