बहिणीप्रमाणेच तुषार कपूर आहे अविवाहित; घेतलाय लग्न न करण्याचा निर्णय

बी टाऊन
भरत जाधव
Updated Jun 02, 2021 | 15:31 IST

बॉलिवूडमध्ये (Bollywood) मोजके अभिनेते आहेत, ज्यांनी कधी लग्न केलं नाही.

Actor tushar kapoor says he will never get married
तुषार कपूूरने घेतलाय अविवाहित राहण्याचा निर्णय  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • तुषार कपूरने घेतलाय कधीही लग्न न करण्याचा निर्णय
  • एका मुलाचा बाप बनून आनंदी आहे तुषार कपूर
  • सरोगेसी करून तुषारने स्वीकारलं आहे पालकत्व

मुंबई : बॉलिवूडमध्ये (Bollywood) मोजके अभिनेते आहेत, ज्यांनी कधी लग्न केलं नाही. सलमान खान, अक्षय खन्ना यासारख्या आधीच्या पिढीतील अभिनेत्यांसह उदय चोप्रा, अभय देओल, रणदीप हुडा हे कलाकारही अद्याप विवाहबंधनात अडकलेले नाहीत. दुसरीकडे, लग्नाच्या बेडीत न अडकताच काही कलाकारांनी पितृत्वसुख अनुभवलं आहे. अभिनेता (Actor) तुषार कपूर (Tusshar Kapoor) हा त्यापैकीच एक. नुकतचं तुषारने आपण कधीच लग्न करणार नसल्याचं सांगितलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तुषारने त्याचे लग्नाबद्दलचे विचार बोलून दाखवले आहेत. तुषार एका मुलाचा बाप आहे आणि पालक म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहे.

मुलाखतीत तुषारला त्याच्या भविष्यातील योजनेबद्दल विचारणा करण्यात आली. लग्न कधी करत आहेस, असे विचारल्यावर तुषार म्हणाला, 'नाही, माझा लग्नाचा कोणताही विचार नाही. कारण जर माझा लग्नाचा विचार असता तर मी एकट्याने मुलाचा सांभाळ करायचं का ठरवले असते. मी प्रत्येक दिवशी माझ्या मुलासोबत काही ना काही नवीन करत असतो. त्याच्याशिवाय इतर कोणताही पर्याय मी निवडू शकत नाही. मी स्वतःला इतर कोणासोबत वाटून घेऊ शकत नाही. आताही नाही आणि भविष्यातही नाही. शेवटी सगळं ठीक होतं आणि आताही सगळं ठीक सुरू आहे.'

पालकत्व म्हणजे साऱ्या जबाबदाऱ्या सांभाळणं 

मागील वर्षी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तुषारने म्हटलं होतं की, प्रकाश झा यांनी त्याला सरोगेसीच्या माध्यमातून बाप बनण्याचा सल्ला दिला होता. तुषारने म्हटले, 'एक आई मुलाचे डायपर बदलते, मुलांना जेवायला देते. लोकांना वाटते हेच पालकत्व आहे. पण तसे नाही. आई- वडील बनणे खूप अवघड आहे. पालक बनणे म्हणजे खूप साऱ्या जबाबदाऱ्या सांभाळणं आहे. याची सुरुवात प्रेमाने होते, जे कोणत्याही अटीशिवाय केले जाते. त्यांना मोठे करणे आणि त्यांना पाठिंबा देत राहणे. तुम्ही बाप आहात म्हणून तुमच्या भावना बदलत नाहीत. मी माझ्या मुलासोबत आनंदी आहे.'

तुषार कपूर सिंगल पेरेंट

44 वर्षांच्या तुषार कपूरने जून 2016 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून पिता होण्याचे सुख अनुभवले. त्याचा मुलगा लक्ष्य आता पाच वर्षांचा होईल. ज्येष्ठ दिग्दर्शक प्रकाश झा यांनी सरोगसीचा पर्याय सुचवल्याचे तुषारने सांगितले होते.तुषार कपूर हा दिग्गज अभिनेते जितेंद्र आणि निर्मात्या शोभा कपूर यांचा धाकटा मुलगा. त्याची मोठी बहीण एकता कपूर प्रख्यात चित्रपट निर्माती आहे. एकताही अविवाहित आहे. भावाच्या पावलावर पाऊल ठेवत एकतानेही 2019 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून मुलीला जन्म दिला.

बॉलिवूडमध्ये वीस वर्षांची कारकीर्द

तुषारने बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन नुकतीच वीस वर्ष झाली. 2001 मध्ये मुझे कुछ कहना है चित्रपटातून त्याने मनोरंजन विश्वात पाय ठेवलं. कुछ तो है, गायब, खाकी असा काही सिनेमात झळकल्यानंतर क्या कूल है हम या चित्रपटामुळे त्याला विनोदी अभिनेता म्हणून ओळख मिळाली. त्यानंतर गोलमाल सिरीजमधील मूक लकीच्या रोलमुळे तो प्रेक्षकांच्या मनात बसला.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी