लगे रहो मुन्नाभाई, जोधा अकबर मधील दिग्गज अभिनेत्याचं निधन

ज्येष्ठ अभिनेते विश्व मोहन बडोला यांचे वयाच्या 84व्या वर्षी निधन झाले. जोधा अकबर, जॉलीने एलएलबी 2, लगे रहो मुन्नाभाई यासारख्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं होतं.

Vishwa_Mohan_Badola
लगे रहो मुन्नाभाई, जोधा अकबर मधील दिग्गज अभिनेत्याचं निधन  |  फोटो सौजन्य: YouTube

थोडं पण कामाचं

  • विश्वमोहन बडोला यांचं सोमवारी रात्री राहत्या घरी निधन झालं.
  • बडोलाचा मुलगा आणि प्रसिद्ध अभिनेता वरुण बडोला याने सोशल मीडियावरुन दिली याबाबतची माहिती 
  • वरुण बडोला यांनी सोशल मीडियावर लिहिली एक भावनिक पोस्ट 

नवी दिल्ली: Vishwa Mohan Badola Dies: जॉली एलएलबी चित्रपटात अक्षय कुमारच्या वडिलांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते विश्व मोहन बडोला यांचं वयाच्या ८४व्या वर्षी निधन झाले. वृद्धापकाळामुळे त्यांचं निधन झालं असल्याचं समजतं आहे. बडोला यांनी बर्‍याच टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले होते आणि ते थिएटर जगातील एक ख्यातनाम व्यक्ती होते.

त्याच्या कुटुंबीयांच्या जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार मोहन बडोला यांचे काल (सोमवार) रात्री उशीरा त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. बडोला यांनी एक व्यावसायिक पत्रकार म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. परंतु नंतर ते कला जगताकडे वळले आणि दिल्लीतील थिएटरमध्ये काम करण्यास त्यांनी सुरवात केली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Varun Badola (@badolavarun)

बडोला यांनी आपल्या पाच दशकांच्या कारकीर्दीत आकाशवाणीसाठी चारशेहून अधिक नाटकांची निर्मिती केली. तसेच त्यांनी आशुतोष गोवारीकर यांच्या ‘स्वदेस’ चित्रपटासह अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये देखील वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.

बडोला यांनी गोवारीकर यांच्या २००८ साली प्रदर्शित झालेल्या‘जोधा अकबर’ या चित्रपटामध्ये आणि राजकुमार हिरानी यांच्या ‘लगे रहो मुन्नाभाई’ मध्ये देखील काम केले होते. तसेच जॉली एलएलबी 2 मध्ये देखील काम केले होते. बडोला यांचा मुलगा आणि प्रख्यात अभिनेता वरुण बडोला याने आज मंगळवार इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट लिहून वडिलांच्या निधनाची बातमी दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी