अभिनेत्री अनन्या पांडेला 'हे' स्वप्न लवकर करायचंय पूर्ण!

बी टाऊन
रोहित गोळे
Updated Aug 26, 2019 | 03:06 IST

स्टुडंट ऑफ द इअर २ या सिनेमानंतर अभिनेत्री अनन्या पांडे हिचं आयुष्य फार बदलून गेलं आहे. आता तिला अनेक सिनेमे ऑफर होऊ लागले आहेत. 

pandey_ananya
अभिनेत्री अनन्या पांडेला 'हे' स्वप्न लवकर करायचंय पूर्ण!  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • अनन्या पांडे संध्या कार्तिक आर्यनसोबत पती, पत्नी और वो या सिनेमाच्या शूटिंगमध्ये आहे व्यस्त
  • १९७८ साली आलेल्या या सिनेमाचा हा रिमेक आहे
  • अनन्याचा हा दुसरा सिनेमा असून तो १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

मुंबई: दिग्दर्शक करण जोहर याचा स्टुडंट ऑफ द इअर २ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अनन्या पांडे हिचं आयुष्य आता पार बदललं आहे. पण असं असलं तरीही ती एका नॉर्मल टीनएजरप्रमाणेच वागण्याचा प्रयत्न करत आहे. २० वर्षीय अनन्या आयएएनएसशी बोलताना असं म्हणाली की, 'स्टुडंट ऑफ द इअर २ नंतर माझं आयुष्य नक्कीच बदललं आहे. आता मला बरीच लोकं ओळखू लागली आहेत. आता वाटतंय की, आपण एक नाव कमावलं आहे. पण मी शक्य तेवढं सामान्य राहण्याचा प्रयत्न करते. मी का सामन्य टीनएजरप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करत आहे. जी मी आहे. मी माझ्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसह फिरायला जाते. मला जेवढं शक्य असेल तेवढ्या नॉर्मल गोष्टी करण्याचा मी प्रयत्न करते आहे.'

अनन्या ही प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडे याची मुलगी आहे. अनन्याचं असं म्हणणं आहे की, एका अभिनेत्याच्या घरात जन्माला येण्याचं सौभाग्य हे तिला मिळालं आहे. ज्यामुळे बॉलिवूडमधील तिचा प्रवेश हा खूप सहज आणि सोपा आहे. पण अनन्याचं असं देखील म्हणणं आहे की, स्टार किट असल्यामुळे बॉलिवूडमध्ये एंट्री सहज मिळते. पण जर आपण तेवढे सक्षम नसाल तर आपल्यावर कोणी पैसे लावणार नाही. येत्या काळात अनन्या ही कार्तिक आर्यनसह पति, पत्नी आणि वो या सिनेमात दिसणार आहे. अनन्याला आता बरंच फेम मिळालं असलं तरीही तिला तिचं एक स्वप्न मात्र पटकन पूर्ण करायंच आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

“enjoy” the little things in life ? thank u for all the love!!!! ? #4MillionLove

A post shared by Ananya (@ananyapanday) on

याच स्वप्नाबाबत सांगताना अनन्या म्हणाली की, 'मी एका अशा ऑफरची वाटत पाहते की, जिथे मला माझ्या वडिलांसोबत काम करण्याची संधी मिळेल. मला आशा आहे की, कोणतीरी नक्कीच आम्हाला अशी ऑफर देईल. जर कुणी ऐकत असेल तर प्लीज तसं करा.' असं म्हणत आपलं हेच स्वप्न असल्याचं म्हटलं आहे. 

दरम्यान, पती, पत्नी और वो हा सिनेमा १९७८ साली बी. आर चोप्रा यांच्या सिनेमाचा रिमेक असणार आहे. या रिमेकचं नाव देखील जुन्या सिनेमाचंच देण्यात आलं आहे. आर्यन कार्तिक हा या सिनेमात तीच भूमिका साकारणार आहे जी संजीव कुमार यांनी तेव्हा साकारली होती. तर भूमि पेडणेकर ही पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. जी विद्या सिन्हा यांनी तेव्हा साकारली होती. तर अनन्या ही या सिनेमात 'वो' ही भूमिका साकारणार आहे. जी ओरिजनल सिनेमात रंजीताने साकारली होती. या सिनेमाचे दिग्दर्शक मुदस्सर अजीज हे आहेत. हा सिनेमा पुढील वर्षी १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी