Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला होणार अटक? ईडीने 9 तास केली चौकशी

बी टाऊन
Updated Dec 09, 2021 | 14:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

ED interrogates Jacqueline Fernandez: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची ईडीकडून बुधवारी तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. जॅकलिनच्या अडचणीत वाढ झाली आहे.

ED interrogates Jacqueline Fernandez
जॅकलिन फर्नांडिसला अटक होण्याची शक्यता, ईडीकडून 9 तास चौकशी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बुधवारी सकाळी 11 वाजता जॅकलिनची चौकशी सुरू झाली होती
  • याआधी जॅकलिनला मुंबई विमानतळावरही थांबवण्यात आले
  • 200 कोटी वसुली प्रकरणी जॅकलिनची चौकशी

ED interrogates Jacqueline Fernandez : नवी दिल्ली : 200 कोटींच्या खंडणीप्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची ईडीकडून बुधवारी
तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. 


बुधवारी सकाळी 11 वाजता चौकशी सुरू झाली

बुधवारी सकाळी 11 वाजता जॅकलिन फर्नांडिस चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात पोहोचली. सुकेश चंद्रशेखरच्या संपर्कात जॅकलिन फर्नांडिस कशी आली याची माहिती ईडीला हवी आहे.आणि खंडणीची 200 कोटी रुपयांची रक्कम लपवण्यात तिने कशी मदत केली याचा सुद्धा तपास ईडी जॅकलिनकडे करत आहे. मात्र, अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जॅकलिन अजूनही या प्रकरणातील सर्व तपशील ईडीला सांगत नाहीये. त्यामुळेच ईडीने जॅकलिनला ९ डिसेंबरला म्हणजेच आज पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे.

जॅकलिन फर्नांडिला समुंबई विमानतळावरही थांबवण्यात आले होते

3 दिवसांपूर्वी ईडीने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला मुंबई विमानतळावर थांबवून चौकशी केली होती. त्यादरम्यान जॅकलीन एका शोच्या निमित्ताने मुंबईहून दुबईला जात होती. त्यादरम्यान, ईडीने त्यांना नोटीस दिली होती आणि 8 डिसेंबर रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात ईडीने यापूर्वी दोनदा जॅकलिनची चौकशी केली आहे.


200 कोटी वसुली प्रकरण

दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखरवर तुरुंग अधिकाऱ्यांच्या संगनमताने २०० कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप आहे. तुरुंगात असलेल्या रेलिगेअरच्या प्रवर्तकांना बाहेर काढण्याच्या नावाखाली त्यांनी सरकारी अधिकारी म्हणून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून वेगवेगळ्या ठिकाणी २०० कोटी रुपये हडप केले. सुकेशने या काळ्या पैशातील मोठा हिस्सा जॅकलिन फर्नांडिसवरही खर्च केल्याचा आरोप आहे. आता ईडीला हे जाणून घ्यायचे आहे की जॅकलिनचे सुकेश चंद्रशेखरशी संबंध आहेत का आणि तिचा या खंडणी प्रकरणात सहभाग होता की नाही.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी