Jacqueline Fernandez: मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez)अडचणी वाढल्या आहेत. घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekar) याच्या 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणाशी संबंधित आरोपपत्रात तिला आरोपी करण्यात आले आहे. हे पुरवणी आरोपपत्र अंमलबजावणी संचालनालय (ED) कडून बुधवारी (17 ऑगस्ट, 2022) दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात दाखल केले जाईल. (actress jacqueline fernandez troubles accused made in 200 crore money laundering case know what is whole case)
आमच्या सहयोगी वृत्तपत्र 'TOI' च्या वृत्तानुसार, या क्षणी जॅकलिनला अटक केली जाऊ शकत नाही, कारण न्यायालयाने अद्याप या प्रकरणातील आरोपपत्राची दखल घेणे बाकी आहे. पण जॅकलिनला भारताबाहेर प्रवास करण्यापासून नक्कीच रोखले जाऊ शकते असे बोलले जात आहे. दरम्यान, तिच्यावर असाही आरोप आहे की, सुकेश तुरुंगात असताना तिने त्याच्यासोबत बातचीत केली होती.
अधिक वाचा: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा पासपोर्ट जप्त
याप्रकरणी ईडीच्या पथकाने यापूर्वीच जॅकलिनची चौकशी केली आहे. श्रीलंकन वंशाच्या या अभिनेत्रीने अधिकाऱ्यांना सांगितले होते की, ती 2017 पासून सुकेशच्या संपर्कात आहे. सुकेशने तिला असं सांगितले होते की, तो तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या कुटुंबातील आहे.
ऑगस्ट 2021 मध्ये सुकेशला अटक करण्यात आली होती, त्यानंतर जॅकलीन त्याला भेटलेली नाही. जॅकलिन म्हणालेली की, 'त्याने मला सांगितले होते की, तो सन टीव्हीचा मालक आहे. आणि जयललिता यांच्या राजकीय कुटुंबातील आहेत.' जॅकलिनने या गोष्टी ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितल्या होत्या, ज्यांचा या प्रकरणाशी संबंधित आरोपपत्रात उल्लेख आहे.
अधिक वाचा: Sunny Leone साडीतही एवढा चांगला खेळ कसा करतेय?, VIDEO मध्ये पहा जबरदस्त मुकाबला
फर्नांडिसने असेही सांगितले होते की, तिच्या बहिणीने चंद्रशेखरकडून दीड लाख अमेरिकन डॉलर्सचे कर्ज घेतले होते. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या भावाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये ट्रान्सफर करण्याचे त्याने मान्य केले होते. ईडीने यापूर्वी जॅकलिनची सुमारे 7 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. विशेष म्हणजे, सुकेशने अभिनेत्री जॅकलिनला अनमोल भेटवस्तू दिल्या होत्या. ज्यामध्ये हिरे, कानातले झुमके, ब्रेसलेट, बर्किनच्या बॅग्स, लुई व्हिटॉनचे शूज आणि एक मिनी कूपर कार यांचा समावेश होता.
या संपूर्ण वादादरम्यान, जॅकलिन आणि सुकेश यांच्या जवळीकांशी संबंधित काही फोटो देखील सोशल मीडियावक लीक झाले होते, ज्यामध्ये विविध गोष्टी समोर आल्या होत्या. दोघांमध्ये अफेअर असल्याचं बोललं जात होतं. अभिनेत्रीसोबतच्या रोमान्सची पुष्टी करून, चंद्रशेखरने एक हस्तलिखित पत्र देखील जारी केले, ज्यात लिहिले होते – आम्ही दोघे रिलेशनशिपमध्ये होतो. हे संबंध कोणत्याही प्रकारच्या फायद्यांवर आधारित नव्हते. एकमेकांबद्दल खूप प्रेम, आदर आणि इतर गोष्टी होत्या.