व्हाईट सूटमध्ये जान्हवीचा सोज्वळ लूक, रक्षाबंधनासाठी करु शकतो ट्राय, पाहा [PHOTOS]

बी टाऊन
Updated Jul 24, 2019 | 16:52 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

जान्हवी कपूर नुकतीच आपला आगामी चित्रपट ‘रूहीअफ्जा’चं शूटिंग संपवून आग्राहून मुंबईत परतलीय. त्यावेळी तिनं पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता. ती या लूकमध्ये खूप सोज्वळ दिसतेय. पाहा जान्हवीचे एअरपोर्टवरील हे फोटोज.

Janhavi kapoor
जान्हवीचा व्हाईट सूटमधील लूक सर्वांना आवडला  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • जान्हवी कपूरचा व्हाईट सूटमधील सोज्वळ लूक फॅन्सना भावला
  • चित्रपट रूहीअफ्जाचं आग्र्यातील शेड्यूल पूर्ण करून मुंबई एअरपोर्टवर जान्हवी झाली स्पॉट
  • जान्हवीचा परिपूर्ण पारंपरिक लूक रक्षाबंधनासाठी बेस्ट

Janhvi Kapoor: बॉलिवूड दीवा जान्हवी कपूरनं गेल्यावर्षीच बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माता बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी इंडस्ट्रीत नवी असेल, मात्र तिच्या स्टाईलसाठी ती आधीपासूनच ओळखली जाते. तिची चॉईस खूप पसंत केली जाते. जान्हवीच्या वॉर्डरोबमध्ये वेस्टर्न आणि ट्रेडिशनल अशा दोन्ही कपड्यांचं परफेक्ट मिश्रण आपल्याला पाहायला मिळते. ती स्टायलिश स्टार किड्स पैकी एक आहे.

नुकतेच जान्हवीचे एअरपोर्टवरील काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये जान्हवी खूपच सोज्वळ दिसतेय. तिनं व्हाईट सूट घातलेला आहे. फुल शिअर स्लीव्जसोबत एक प्रिंटेड कुर्ता जान्हवीनं घातलेला आहे. त्याला प्लाझो आणि मॅचिंग प्रिंटेड व्हाईट ओढणीसोबत वेअर केलंय. जान्हवीनं आपला हा लूक सिल्वर बांगड्या आणि झुमके घालून पूर्ण केलाय. तर पिंक लिप्स सोबत सबटल मेकअपमध्ये जान्हवी खूप सुंदर दिसतेय. हेअरस्टाईलबद्दल बोलायचं झाल्यास यात ड्रेससोबत जान्हवीनं आपल्या केसांना सेंटर पार्टिंगसोबत मोकळं ठेवलं आहे. तिचा हा लूक स्टायलिश तर वाटतोच पण त्याचसोबत हा लूक खूप कंफर्टेबल आणि सोज्वळ वाटतोय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#jhanvikapoor back from mumbai after complete her shoot snapped at airport #airportdiaries #viralbayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

आपण सुद्धा रक्षाबंधनासाठी करा ट्राय

जान्हवी कपूरचा हा ट्रेंडी लूक आपण रक्षाबंधनासाठी ट्राय करू शकता. कारण रक्षाबंधन हा एक असा सण आहे, ज्यात आपण खूप हेवी किंवा अगदीच कॅज्युअल आऊटफिट घालू शकत नाही. अशातच जान्हवीचा हा लूक आणि सूट सणासाठी एकदम परफेक्ट आहे. फक्त आपल्याला याचपद्धतीनं हा लूक परफेक्ट करता यायला हवा. यासाठी आपण ऑनलाईन सुद्धा सूट खरेदी करू शकता किंवा फॅब्रिक घेऊनही स्टिच करू शकता. कारण अजून रक्षाबंधनाला तसे बरेच दिवस बाकी आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Simply best

A post shared by Janhvi Kapoor Fc (@jhanhvikapoor) on

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Janhvi Kapoor Fc (@jhanhvikapoor) on

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Simply best #JanhviKapoor

A post shared by Janhvi Kapoor Fc (@jhanhvikapoor) on

हे पहिल्यांदा नाही की, जान्हवी आपल्याला सूटमध्ये दिसली असेल. भारतीय पारंपरिक वेशभूषेत जान्हवी नेहमीच दिसते. तसंच अनेकदा तिला आपण सलवार सूटमध्ये पण पाहिलंय. जान्हवी नुकतीच तिच्या आगामी चित्रपटाचं रूहीअफ्जाचं आग्रा इथल्या शेड्यूलचं शूटिंग संपवून आलीय.

वर्कफ्रंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर करण जोहरच्या ‘धडक’ या चित्रपटातून जान्हवीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यात तिच्यासोबत ईशान खट्टरनं काम केलं होतं. धडक हा मराठी सुपरहिट चित्रपट सैराटचा रिमेक होता. याशिवाय जान्हवी गुंजन सक्सेना यांच्यावरील बायोपिक ‘कारगिल गर्ल’मध्ये काम करतेय. गुंजन सक्सेना या पहिल्या भारतीय महिला लढाऊ विमान पायलट आहे, ज्यांनी कारगिल युद्धात भाग घेतला होता. या चित्रपटात जान्हवीसोबत अंगद बेदी आणि पंकज त्रिपाठी महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

तर चित्रपट ‘रूहीअफ्जा’मध्ये जान्हवी राजकुमार रावसोबत काम करतेय. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. याशिवाय जान्हवी करण जोहरच्या मल्टीस्टारर चित्रपट ‘तख्त’मध्ये पण काम करणार आहे. यात जान्हवी सोबतच करिना कपूर खान, आलिया भट्ट, रणवीर सिंह, विक्की कौशल आणि भूमि पेडणेकर हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...