Kalki Koechlin: नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्री कल्की कोचलीन फ्लॉन्ट करताना दिसली बेबी बंप

बी टाऊन
Updated Jan 13, 2020 | 16:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलीन प्रेग्नेंट असून प्रेग्नेंसीचे अगदी शेवटचे आठवडे ती अनुभवते आहे. अनेकदा ती तिच्या प्रेग्नेंसी फेझमधील बरेच फोटो शेअर करताना दिसते. असाच एक नवीन फोटो तिने शेअर केला आहे. पाहा फोटो.

actress kalki koechlin slays in her new picture as she flaunts her baby bump with swag 
Kalki Koechlin: नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्री कल्की कोचलीन फ्लॉन्ट करताना दिसली तिचं बेबी बंप  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • अभिनेत्री कल्की कोचलीनने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला नवा फोटो
  • ट्रोलर्सच्या नाकावर टिचून केलं क्यूट बेबी बंप फ्लॉन्ट
  • कल्की कोचलीनचा असाही अंदाज

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलीन तिच्या भूमिकांसाठी तर प्रसिद्ध आहे तितकीच प्रसिद्ध आहे तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी, म्हणूनच मध्यंतरी जेव्हा ती प्रेग्नेंट असल्याचं कळलं तेव्हा तिने ट्रोलर्सना अतिशय उत्तम पद्धतीने उत्तर सुद्धा दिलं. ही सगळी तोंडं बंद करत ती तिची प्रेग्नेंसी एकदम मस्त एन्जॉय करताना दिसत आहे. अनेकदा कल्की तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तिच्या प्रेग्नेंसी फेसमधले काही लक्षणीय क्षण फोटोच्या रुपात शेअर करताना दिसते. प्रेग्नेंसी म्हणजे एका महिलेसाठी खूप मोठं आव्हान असतं आणि त्यातले प्रत्येक हळुवार क्षण सध्या कल्की अनुभवत आहे. कल्कीच्या प्रेग्नेंसीचे हे काही शेवटचे आठवडे शिल्लक राहिले असून ती तिच्या घरी येणाऱ्या नवीन पाहुण्याचे स्वागत करण्यासाठी एकदम सज्ज झाली आहे. 

कल्की तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फारच अॅक्टिव्ह असून तिच्या प्रेग्नेंट लाईफमधले बरेच फोटो ती कायम शेअर करताना दिसते. यातच तिने आता एक अतिशय सुंदर फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नुकताच शेअर केला आहे. या 36 वर्षीय अभिनेत्रीने शेअर केलेला हा फोटो नक्कीच पाहण्यासारखा आहे. एका कॅमिसोल टॉप आणि शॉर्ट्समध्ये कल्की या फोटोमध्ये दिसून येते. ज्यामध्ये खाली झोपली असून तिने आपले पाय खिडकीवर ठेवले आहेत. विशेष म्हणजे हा फोटो ब्लॅक अॅण्ड व्हाईटमध्ये टिपला गेला आहे. ज्यामुळे तो अधिक सुंदर दिसतो. फोटो शेअर करत तिने त्याला कॅप्शन दिलं, 'माझे पाय वरती ठेवण्याची मला अत्यंत गरज आहे... शब्दशः...' याचसोबत तिने काही हॅशटॅग टाकले आहेत ज्यामध्ये तिच्या प्रेग्नेंटलाईफ च्या भावना व्यक्त होतात.

कल्की ने नुकताच शेअर केलेल्या फोटोची झलक पाहा:

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Need to put my feet up. Quite literally. #swellings #pregnancy #longdays

A post shared by Kalki (@kalkikanmani) on

कल्की काही महिन्यांपूर्वी गल्ली बॉय सिनेमांमध्ये शेवटची झळकली त्यानंतर तिच्या प्रेग्नेंसीची बातमी येताच सगळीकडे त्यावर चर्चा रंगलेली दिसली. या सगळ्या चर्चांना न जुमानता कल्की मात्र आपली प्रेग्नेंसी छान एन्जॉय करताना दिसत आहे. नुकताच तिने एका बीचवर बिकिनी घालून आपला बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा फोटो देखील शेअर केला होता. गुलाबी कलरची बिकनी आणि त्याला मॅचिंग अशी मोठी टोपी घातलेल्या कल्कीचा स्वॅग या फोटोत अगदी स्पष्टपणे झळकत होता. हा बिकनी मधला फोटो शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये कल्कीने तिला पाठिंबा दिल्याबद्दल तिच्या मित्रांचे आणि परिवाराचे आभार मानले. तसेच 2020 मध्ये येणाऱ्या नवीन फेझसाठी ती किती उत्सुक आहे ते सुद्धा तिने त्यात मांडलं होतं.

आता जरी कल्की आपली प्रेग्नंसी छान एन्जॉय करत असली तरी प्रेग्नंसीचे पहिले तीन महिने मात्र कल्कीसाठी थोडे कठीण गेले. मिड डेला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान कल्की म्हणाली होती, "मी जेव्हा पहिल्यांदा हृदयाचे ठोके ऐकले तेव्हा मी फार उत्सुक झाले. माझे पहिले तीन महिने फार कठीण होते पण आता तो फेझ संपला आहे आणि जानेवारीमध्ये असलेल्या माझ्या ड्यू डेटची मी आतुरतेने वाट पाहत आहे." कल्की तिच्या बॉयफ्रेंड गाय हर्षबगसोबत रिलेशनशिपमध्ये असून सध्या प्रेग्नेंट आहे. कल्की तिच्या पहिल्या बाळाचं स्वागत गोव्यामध्ये करणार असल्याचं समजतं आहे. तसंच तिने वॉटर डिलिव्हरी करण्याचं ठरवलं आहे. त्याचसोबत तिच्या छोट्या पाहुण्याचं नाव तिने आधीच ठरवलं असून ते नाव मुलगा किंवा मुलगी दोघांनाही चालू शकेल असंच आहे असं बोललं जात आहे. कल्कीला या नवीन फेझसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी