अभिनेत्री मौनी रॉय ट्रोलर्सच्या निशाण्यावर, पाहा काय केलंय तिनं

बी टाऊन
Updated Jun 05, 2019 | 16:17 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

सलमान खानच्या फिल्म ‘भारत’च्या प्रिमिअरला पोहोचलेल्या अभिनेत्री मौनी रॉयला तिच्याच फॅन्सनी ट्रोल केलं आहे. तिचा चेहरा बघून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलंय. जाणून घ्या असं काय केलंय मौनीनं आपल्या चेहऱ्यासोबत...

Mouni Roy
अभिनेत्री मौनी रॉय ट्रोलर्सच्या निशाण्यावर  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय फॅन्सची लाडकी आहे. मौनी रॉयनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर ती आता बहुतेक इव्हेंटला न चुकता आपली हजेरी लावते. नुकतीच मौनी रॉय सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर फिल्‍म भारतच्या प्रिमिअरला पोहोचली. तिथं तिचा लूक चर्चेचा विषयच बनला. या इव्हेंटमध्ये मौनी स्टायलिश लूकमध्ये पोहोचली खरी पण तिचा चेहरा बघून सर्वांनीच भुवया उंचावल्या.

मौनी रॉयचा चेहरा पहिल्यापेक्षा जास्त सुजलेला दिसत होता. बस्स, याच गोष्टीवरून नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरलंय. मौनीला यूजर्सनी ट्रोल करण्यास सुरूवात केली. मौनी रॉयचा फोटो बघून एका यूजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, 'सिलिकॉन वापरण्याची हद्दच पार केली आहे'. तर, आणखी एका यूजरनं म्हटलं की, 'ओठ सुजून सुजून आता तर खालीच पडतील'. आणखी एकानं लिहिलं आहे, 'इतक्या सर्जरी करून आता तर ही भयंकर दिसायला लागली आहे.' मौनीचा चेहरा सर्जरीनंतर इतका बिघडला आहे की जसा तिचा फोटो सोशल मीडियावर आला तसं ट्रोलर्सनी फोटोवर कमेंट्सची सरबत्ती सुरू केली.

 

 

काही यूजर्सनी तर मौनीच्या चेहऱ्याची तुलना आयटम डान्सर राखी सावंतबरोबर केली आहे. मौनी रॉयला जेव्हा मीडियानं तिच्या ओठांबद्दल विचारलं, तेव्हा तिनं तुम्ही माझं इंस्‍टाग्राम अकाऊंट बघा, असं उत्तर दिलं. काही जणांना तर तिनं इंटरव्ह्यू देण्यासही नकार दिलाय.

मौनी रॉयनं गेल्यावर्षीच ‘गोल्ड’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलाय. ही फिल्म हिट झाली. त्यानंतर तर मौनीला नवनवीन प्रोजेक्ट्सच्या ऑफर्स मिळायला लागल्या. मौनीच्या अभिनयासोबतच ती तिच्या ग्लॅमरस स्टाईलसाठी ओळखली जाते. तिच्या या फॅशन सेंसमुळे ती चांगलीच प्रसिद्ध आहे.

मौनी रॉयबद्दल नुकतीच एक बातमी कळलीय. तिला तिच्या अपकमिंग चित्रपट ‘बोले चुडिया’ मधून काढून टाकण्यात आलंय. ती या फिल्ममध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर दिसणार होती. दोघांचे लुक्सपण समोर आले होते. मात्र तिला आता चित्रपटातून घरचा रस्ता दाखवला गेलाय. तिच्या अनप्रोफेशनल आणि बेजबाबदार वागण्यामुळे हे पाऊल उचललं गेल्याचं समजतंय. काही दिवसांपूर्वी तिनं टिव्हीवर कमबॅक करत ‘नागिन ३’ या मालिकेत काम केलंय.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी