पाहा अभिनेत्री नेहा धूपिया वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलीय तरी कुठे!

बी टाऊन
Updated Aug 26, 2019 | 00:21 IST

Neha Dhupia: अभिनेत्री नेहा धुपिया लवकरच आपला ३९वा वाढदिवस साजरा करणार आहे. पण आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी नेहा थेट मालदीवला पोहचली आहे. 

neha dhupia
पाहा नेहा धूपिया वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलीय तरी कुठे!  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • अभिनेत्री नेहा धूपिया पती अंगद बेदीसोबत मालदीवला 
  • वाढदिवस साजरा करण्यासाठी नेहा पतीसोबत मालदीव व्हेकेशनवर 
  • नेहा आणि अंगदसोबत त्यांची मुलगी मेहरसुद्धा एन्जॉय करतेय सुट्टी 

मालदीव: अभिनेत्री नेहा धूपिया हिचा २७ ऑगस्टला ३९वा वाढदिवस आहे. त्यामुळे आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी नेहा थेट मालदीवला पोहचली आहे. पण हे खास गिफ्ट तिला तिच्या नवऱ्याने म्हणजेच अंगद बेदीने दिलं आहे. कारण नेहाला तिच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी तो मालदीवला घेऊन गेला आहे. दरम्यान, नेहाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर मालदीवचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. सध्या नेहा आणि तिचा पती मालदीवमध्ये खूपच एन्जॉय करत आहेत. 

या फोटोमध्ये आपण पाहू शकता की, दोघं खूपच एन्जॉय करत आहेत. नेहाने मालदीवला समुद्र किनारी बरीच धमाल मस्तीही केली. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये आपण पाहू शकता की, नेहाने गुलाबी रंगाची बिकिनी परिधान केली आहे. ज्यामध्ये ती खूप हॉट दिसते. तिच्या चेहऱ्यावरील हास्य हेच दर्शवतं आहे की, ती हे आनंदाचे क्षण पूर्णपणे जगू इच्छिते. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरुन आनंद ओसंडून वाहतो आहे. नेहाने हा फोटो शेअर केल्यानंतर तिच्या या फोटोला आतापर्यंत २ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. नेहा आणि अंगद हे हनीमूनसाठी देखील मालदीवमध्येच गेले होते. त्यामुळे आता देखील त्यांनी याच ठिकाणी जाणं पसंत केलं आहे. यावेळी त्या दोघांसोबत त्यांची मुलगी मेहर देखील आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Casually getting into the weekend and into the ocean... @centaragrandmaldives #maldives

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia) on

मालदीव हॉलिडेवर जाताना अंगदने आपल्या फॅन्सना सांगितलं आहे की, 'मागील काही महिने खूपच व्यस्त असल्याने कुटुंबीयांना वेळ देता आला नाही. त्यामुळे आता खूप आनंद वाटत आहे की, आम्ही सगळे या सुट्टी एन्जॉय करण्यासाठी जात आहोत. तसं पाहिल्यास मागील दोन वर्ष हे माझ्यासाठी खूपच चांगले होते. व्यायसायिक स्तरावर देखील चांगली कामं सुरु आहेत. त्यामुळे मी याआधी एवढा कधीच बिझी नव्हतो. मला माझ्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवायला खूप आवडतं. त्यामुळे कधीतरी कामातून थोडा ब्रेक घेणं देखील चांगलं असतं. कारण आपण काम कुणासाठी करत असतो? आपल्या परिवारासाठीच ना...' 

दरम्यान, नेहा आणि अंगद यांनी दिल्लीत अगदी गुपचूप लग्न केलं होतं. तिने आपल्या इंस्टाग्रामवरुनच याची माहिती दिली होती. त्यानंतर लग्नाच्या तीन महिन्यानंतरच तिने सांगितलं होतं की, ती लवकरच आई होणार आहे. यावेळी अंगदने असं म्हटलं होतं की, 'लग्नाच्या काही दिवस आधीच नेहा प्रेग्नंट होती. जेव्हा मी माझ्या आई वडिलांना याबाबत सांगितलं होतं तेव्हा मला त्यांच्याकडून बराच ओरडा मिळाला होता. बहुधा त्यांना माझ्याकडून अशी अपेक्षा नसेल म्हणून.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
पाहा अभिनेत्री नेहा धूपिया वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलीय तरी कुठे! Description: Neha Dhupia: अभिनेत्री नेहा धुपिया लवकरच आपला ३९वा वाढदिवस साजरा करणार आहे. पण आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी नेहा थेट मालदीवला पोहचली आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
निक जोनासच्या वाढदिवसानिमित्त प्रियंका चोपडाने शेअर केला खास VIDEO
निक जोनासच्या वाढदिवसानिमित्त प्रियंका चोपडाने शेअर केला खास VIDEO
मिलिंद नार्वेकरांशी फोनवरून चर्चेनंतर उर्मिला मातोंडकरांनी केले मोठे वक्तव्य 
मिलिंद नार्वेकरांशी फोनवरून चर्चेनंतर उर्मिला मातोंडकरांनी केले मोठे वक्तव्य 
[VIDEO] Bigg Boss 13: बिग बॉस १३च्या नवीन प्रोमोमध्ये सलमानचा हटके अंदाज, ‘या’ तारखेला सीझन सुरु
[VIDEO] Bigg Boss 13: बिग बॉस १३च्या नवीन प्रोमोमध्ये सलमानचा हटके अंदाज, ‘या’ तारखेला सीझन सुरु
बिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये हॉट अवतारात दिसली जेनिफर विगेंट
बिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये हॉट अवतारात दिसली जेनिफर विगेंट
अरं अरं... खतरनाक... प्रविण तरडे दिसणार इन्स्पेक्टर दिवानेच्या भूमिकेत
अरं अरं... खतरनाक... प्रविण तरडे दिसणार इन्स्पेक्टर दिवानेच्या भूमिकेत
[VIDEO] MeTooचे आरोपी सुभाष कपूर सोबत काम करण्यात आमिर खान तयार, समोर आले हे कारण 
[VIDEO] MeTooचे आरोपी सुभाष कपूर सोबत काम करण्यात आमिर खान तयार, समोर आले हे कारण 
आधी ब्रेकअप आणि आता 3 वर्षानंतर एकत्र दिसणार रणबीर- कतरिना 
आधी ब्रेकअप आणि आता 3 वर्षानंतर एकत्र दिसणार रणबीर- कतरिना 
[VIDEO] काय आहे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा लकी चार्म, सोनम कपूरने शेअर केला व्हिडिओ 
[VIDEO] काय आहे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा लकी चार्म, सोनम कपूरने शेअर केला व्हिडिओ