'या' अभिनेत्रीला कोर्टाने सुनावली आठ दिवसांची कोठडी, पाहा हिने नेमकं केलं काय 

बी टाऊन
रोहित गोळे
Updated Dec 16, 2019 | 15:24 IST

Payal Rohtagi Judicial Custody: नेहरु कुटुंबीयांबाबत वादग्रस्त व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी अभिनेत्री पायल रोहतगी हिला अटक करण्यात आली असून तिला कोर्टाने आठ दिवसांच्या न्यायलयीन कोठडीत पाठवलं आहे. 

actress payal rohatgi who was arrested  has been sent to eight day judicial custody by a local court
'या' अभिनेत्रीला कोर्टाने सुनावली आठ दिवसांची कोठडी, पाहा हिने नेमकं केलं काय   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • अभिनेत्री पायल रोहतगीला पोलिसांनी केली अटक 
  • पायल रोहतगीला कोर्टाने सुनावली आठ दिवसांची न्यायालयीन कोठडी 
  • पायल रोहतगीने नेहरु कुटुंबीयांविरुद्ध केला होता वादग्रस्त व्हिडिओ शेअर  

मुंबई: बिग बॉस सीझन २ ची स्पर्धक आणि अभिनेत्री पायल रोहतगी हिला राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे. पायलने नेहरु कुटुंबीयांविषयी एक वादग्रस्त व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामुळे आता पायलला आठ दिवस न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पायलला राजस्थानमधील बूंदी येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर कोर्टाने तिला आठ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पायल रोहतगी विरुद्ध कलम ६६ आणि ६७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

पायल रोहतगीच्या टीमने सोशल मीडियावर ट्वीट करुन तिच्या अटकेची माहिती दिली.  तिच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन पोस्ट करण्यात आलं की, 'मला राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे. मी मोतीलाल नेहरुंवर व्हिडिओ तयार केला होता. ज्याचा आधार मी गुगलवरुन घेतला होता. त्यामुळे आता बोलण्याचे स्वातंत्र ही फक्त एक मस्करी आहे.' 

ट्विटरवर ट्रेंड होतोय  #IStandWithPayalRohatgi 

पायल रोहतगी हिला अटक केल्यानंतर ट्विटरवर  #IStandWithPayalRohatgi हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. पायलला पाठिंबा दर्शवत अनेक सेलिब्रिटींनी देखील ट्वीट केलं आहे. बिग बॉस १३ ची स्पर्धक कोयना मित्रा हिने असं म्हटलं की, 'आपलं नाव बदलून हाफिज सईद ठेवा. यानंतर काँग्रेस आपल्याला सॅल्यूट करेल. लाज वाटू दे जरा काँग्रेस सरकार.' 

दरम्यान, काँग्रेस नेते शशी थरुर यांनी देखील पायल रोहतगीसाठी ट्वीट केलं आहे यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, 'यामध्ये काहीही संशय नाही की, पायल रोहतगीचे कमेंट्स हे खूपच वाईट, खोटे आणि व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केलेल्या गोष्टींवर आधारित असतात. पण, तिला करण्यात आलेली अटक हा मूर्खपणा आहे. तिला सोडून दिलं पाहिजे.' 

सप्टेंबरमध्ये शेअर केला होता पायलने व्हिडिओ

पायल रोहतगी हिने सप्टेंबर महिन्यात आपल्या फेसबुक अकाउंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये तिने स्वातंत्र्य सेनानी मोतीलाल नेहरु, दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी आणि संपूर्ण नेहरु कुटुंबीयामधील महिलांबाबत अत्यंत आक्षेपार्ह कमेंट्स केले होते. 

यानंतर पायलविरुद्ध राजस्थान यूथ काँग्रेसचे सरचिटणीस चर्मेश शर्मा यांनी पोलिसात तक्रार नोंदवली होती. या प्रकरणी पायलला पोलिसांनी नोटीसही धाडली होती. अखेर काल (रविवार) अटक करण्यात आली. 

अभिनेत्री पायलने ३६ चायना टाउन, फगली यासारख्या अनेक सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी