अश्लील फोटो, व्हिडिओ शूट करणं महागात पडलं, पूनम पांडेला पोलिसांनी घेतलं ताब्यात 

अभिनेत्री पूनम पांडे हिला उत्तानावस्थेतील फोटो शूटप्रकरणी गोवा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याशिवाय तिच्या पतीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

Poonam-Pandey
पूनम पांडे  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • अभिनेत्री पूनम पांडे आणि तिच्या पतीला पोलिसांनी घेतलं ताब्यात
  • अश्लील फोटो आणि व्हिडिओ शूट करणं पडलं महागात
  • गोवा पोलिसांनी केली कारवाई

पणजी: अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिला सार्वजनिक ठिकाणी अश्लील व्हिडिओ करणं चांगलंच महागात पडलं आहे. कारण की, याचप्रकरणी गोवा पोलिसांनी आज (गुरुवार) तिला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, चौकशीनंतर तिला अटक देखील करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच स्थानिक कोर्टात हजर करुन तिच्या कोठडीची देखील पोलिसांकडून मागणी केली जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातील अगौंदा रिसॉर्टमधून पूनम पांडे हिला ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच याप्रकरणी फोटो शूट करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूनम पांडे हिने गोव्यातील चापोली धरणावर आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ शूट केलं होतं. 

दरम्यान, यावेळी पूनम पांडे हिच्यासह तिचा पती सॅम बॉम्बे याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कारण जेव्हा हे शूट सुरु होतं तेव्हा सॅम हा तिथेच उपस्थित होता. याशिवाय दोन साध्या वेषातील पोलीस देखील यावेळी तिथे हजर होते जे पूनमला संरक्षण देत असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे या दोन्ही पोलिसांना देखील याप्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे. तसंच धरणावर असणाऱ्या दोन सुरक्षा रक्षकांना देखील निलंबित करण्यात आलं आहे. या संपूर्ण व्हिडिओ शूटप्रकरणी गोवा फॉरवर्ड पक्षाच्या महिला विंगने पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
I feel comfortable in black. Shot by: @browning_hill A post shared by Poonam Pandey Bombay (@ipoonampandey) on

दुसरीकडे या प्रकरणी गोव्यातील काणकोण येथील नागरिकांनी याप्रकरणी तात्काळ कारवाई करावी यासाठी गुरुवारी बंदची हाक देखील देण्यात आली होती. मात्र, आता पूनम पांडेला ताब्यात घेतल्यानंतर हा बंद मागे घेतला गेला आहे. 

पूनम पांडे ही नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडत असते. याआधी देखील अनेकदा तिने वाद ओढावून घेतले आहेत. नुकतंच तिने लग्नानंतर तात्काळ आपल्या पतीविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार केली होती. पण त्यानंतर दोनच दिवसात सारं काही चांगलं असल्याचं म्हणत तक्रार मागे घेतली होती. २०११ साली टीम इंडिया विश्वचषक जिंकल्यास आपण न्यूड व्हिडिओ शूट करु असं पूनमने जाहीररित्या म्हटलं होतं. तेव्हापासून ती खूपच चर्चेत आली. त्यानंतर मीडियामध्ये सातत्याने चर्चेत राहावं यासाठी ती नेहमीच अशाप्रकारचे स्टंट करत असते.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी