‘या अभिनेत्रीच्या बॅड लकमुळे झालं श्रीदेवींचं निधन’, ट्रोलर्सला अभिनेत्रीनं दिलं चोख उत्तर

बी टाऊन
Updated Apr 23, 2019 | 13:31 IST | टाइम्स नाऊ हिंदी

सोशल मीडियावर एका व्यक्तीनं अभिनेत्री प्रिया आनंदला ट्रोल करत तिला श्रीदेवी यांच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवलं, यानंतर त्या ट्रोलरला चांगलंच उत्तर मिळालं. जाणून घ्या हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते...

Priya Anand
प्रिया आनंद  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: सोशल मीडिया सध्या एक असा प्लॅटफॉर्म बनलाय जिथं लोकं सेलिब्रिटीजना ट्रोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. या ट्रोलिंगकडे बरेचदा सेलिब्रिटीही दुर्लक्ष करतात, मात्र अनेक वेळा हे ट्रोलिंग अशा पातळीवर पोहोचतं की त्यानंतर सेलिब्रिटींना उत्तर द्यावंच लागतं. नुकतीच अशी घटना अभिनेत्री प्रिया आनंदसोबत घडली आहे.

ट्विटरवर एका व्यक्तीनं ट्वीट करत लिहिलं की, 'जे कलाकार प्रिया आनंदसोबत काम करतात, त्यांचं निधन होतं.' या व्यक्तीनं ट्वीट करत लिहिलं, ‘श्रीदेवीनं इंग्लिश-विंग्लिशमध्ये प्रिया आनंदसोबत काम केलं आणि त्या आता या जगात नाहीयेत. जेके रितेश यांनी प्रिया आनंद सोबत एलकेजीमध्ये काम केलं आणि आज ते पण या जगात नाहीत. जे कलाकार प्रिया आनंद सोबत काम करतात, त्यांचं निधन होतं. प्रिया आनंद आपल्या सहकलाकारांसाठी बॅड लक घेऊन येते का?’

 

 

हे ट्वीट पाहून प्रियानं त्या ट्रोलरला जबरदस्त उत्तर दिलं. तिनं ट्विट करत लिहिलं, ‘साधारणपणे मी तुमच्यासारख्या लोकांना उत्तर देत नाही, मात्र मी अतिशय संवेदनशील आहे हे आपल्याला सांगू इच्छिते. मला वाटतं सोशल मीडिया आपला मुकेपणा व्यक्त करण्यासाठी चांगलं माध्यम आहे. मात्र आपण अतिशय वाईटपणे हे व्यक्त केलं. मी आपल्याला खालची पातळी दाखवून उत्तर देणार नाहीय.’

प्रियानं पुढे लिहिलं, 'आपण लक्षात ठेवा की तुमच्या शब्दांमुळे कुणाला दु:ख होऊ शकतं. यापुढं असं काही बोलण्याआधी आपण विचार कराल आणि थोडा संयम बाळगाल, अशी मी आशा करते.'

 

यानंतर ट्रोलरला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यानं अभिनेत्रीची क्षमा मागितली. त्यानं लिहिलं, ‘मला क्षमा करा, मी माझी चूक कबूल करतो आणि क्षमा मागतो. आज मी आपले दोन्ही चित्रपट एलकेजी आणि इंग्लिश विंग्लिश बघत होतो. आपण दोन्ही चित्रपटांमध्ये आहात, तर माझ्या डोक्यात हा प्रश्न निर्माण झाला आणि मी ट्वीट केलं. मी विचार केला की हे ट्विट आपण वाचणार नाही. आपल्याला दु:ख दिलं, मला माफ करा’. यानंतर अभिनेत्रीनं उत्तर देत लिहिलं, ‘आपल्या क्षमेसाठी धन्यवाद, मी याची प्रशंसा करते.’

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

This is just the saddest news to wake up to! Heartbreaking. Fan girl for life! #sridevi

A post shared by Priya Anand (@priyawajanand) on

 

 

 

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं गेल्या वर्षी दुबईमध्ये निधन झालं होतं. त्यांच्या मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाला होता, असं बोललं जात आहे. तर अभिनेते जे के रितेश यांचा नुकतंच हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं.

अभिनेत्री प्रिया आनंदनं चित्रपट ‘वामनन’पासून आपल्या अभिनयाच्या करिअरला सुरूवात केली होती. तसंच फुकरे आणि रंगरेज सारख्या बॉलिवूड फिल्ममध्येही काम केलं आहे. प्रियाने लीडर आणि रामा रामा कृष्णा कृष्णा सारख्या तेलुगू चित्रपटांमध्येही काम केलंय. याशिवाय प्रिया आता अर्जुन रेड्डीचा तमिळ रिमेक करतेय.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
‘या अभिनेत्रीच्या बॅड लकमुळे झालं श्रीदेवींचं निधन’, ट्रोलर्सला अभिनेत्रीनं दिलं चोख उत्तर Description: सोशल मीडियावर एका व्यक्तीनं अभिनेत्री प्रिया आनंदला ट्रोल करत तिला श्रीदेवी यांच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवलं, यानंतर त्या ट्रोलरला चांगलंच उत्तर मिळालं. जाणून घ्या हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते...
Loading...
Loading...
Loading...