प्रसिद्ध अभिनेत्री शशिकला यांचे निधन

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला जावळकर यांचे आज (रविवार, ४ एप्रिल २०२१) दुपारी बारा वाजता निधन झाले.

Actress Shashikala passes away
प्रसिद्ध अभिनेत्री शशिकला यांचे निधन 

थोडं पण कामाचं

  • प्रसिद्ध अभिनेत्री शशिकला यांचे निधन
  • अभिनेत्री शशिकला यांना २००७ मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला
  • शशिकला यांच्यावर मुंबईच्या कुलाबा परिसरातील चर्चमध्ये अंत्यसंस्कार

मुंबईः बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला जावळकर यांचे आज (रविवार, ४ एप्रिल २०२१) दुपारी बारा वाजता निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या. अभिनयाच्या जोरावर त्यांनी दोन दशके गाजवली. मुख्य अभिनेत्री, खलनायिका, आई अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी साकारल्या. त्यांनी १००पेक्षा जास्त सिनेमांत काम केले. शशिकला यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी शोक व्यक्त केला. (Actress Shashikala passes away)

बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेत्री अशी त्यांची ओळख होती. बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक यांच्यासोबत त्यांनी काम केले. अभिनेत्री शशिकला यांनी ‘आरती’, ‘नौ दो ग्यारह’, ‘कानुन’, ‘जंगली’, ‘हरियाली और रास्ता’, ‘अनपढ’, ‘यह रास्ते हैं प्यार के’, ‘वक्त’, ‘देवर’, ‘अनुपमा’, ‘नीलकमल’, ‘तीन बहुरानियाँ’, ‘हमजोली’, ‘सरगम’, ‘क्रांती’, ‘रॉकी’, ‘बादशहा’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘चोरी चोरी’, ‘मुझसे शादी करोगी’ अशा अनेक सिनेमांतून काम केले. त्यांनी अभिनय केलेले अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर हीट झाले. शशिकला २००५ पर्यंत सिनेमांतून काम करत होत्या. नंतर वयामुळे त्यांनी काम करणे थांबवले. 

अभिनेत्री शशिकला यांना २००७ मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. साधी राहणी उच्च विचारसरणी अशी त्यांची जीवनशैली होती. शशिकला यांच्यावर मुंबईच्या कुलाबा परिसरातील चर्चमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी